स्मार्ट अंगणवाड्या फक्त कागदावरच; पावसाळ्यात गळक्या छिद्र पडलेल्या पत्र्यांचा निवारा तर पिण्याच्या पाणी व स्वच्छतागृहांची वानवा चिमुकल्यांची परवड सुरूच :- डॉ.गणेश ढवळे

स्मार्ट अंगणवाड्या फक्त कागदावरच; पावसाळ्यात गळक्या छिद्र पडलेल्या पत्र्यांचा निवारा तर पिण्याच्या पाणी व स्वच्छतागृहांची वानवा चिमुकल्यांची परवड सुरूच :- डॉ.गणेश ढवळे
—
बीड:- ( दि.०१ )एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी योजना राबविण्यात येते.या योजनेंतर्गत अंगणवाडीतील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचा भौतिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय आहे.या मुलांना पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, औपचारिक शालेय शिक्षण केंद्रातुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र स्मार्ट अंगणवाडी कागदावरच राहिल्या असुन कंत्राटदार पोसण्यासाठी अनावश्यक गोष्टींवर भरमसाठ खर्च होत असतानाच मुलभूत सुविधा मलांना सुरक्षित निवारा,पिण्याचे शुद्ध पाणी, वीजपुरवठा तसेच दरवाजे, खिडक्या दुरूस्ती व स्वच्छतागृहांची वानवा असल्याचे आढळून येते. संबंधित प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता मात्र शासन आणि प्रशासन स्तरावर अद्याप याची अंमलबजावणी झाली नसुन प्रशासनाला याचे गांभीर्य दिसून येत नसल्याची खंत डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली.
स्मार्ट अंगणवाड्या कागदावरच ; वीजपुरवठाच नसल्याने एलईडी टीव्ही,वाटर प्युरीफायर धुळखात पडुन , कंत्राटदार पोसण्यासाठीचा अट्टाहास:- डॉ.गणेश ढवळे
—
स्मार्ट अंगणवाडीच्या दृष्टीने अत्यावश्यक ई लर्निग सुविधा ज्यामध्ये एलईडी टीव्ही तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून लावण्यात आलेले वाटर प्युरीफायर अंगणवाडी मध्ये वीजपुरवठाच नसल्याने धुळखात पडुन असुन केवळ कंत्राटदार पोसण्यासाठी अंगणवाडीला एलईडी टीव्ही आणि वाटर प्युरीफायरचा पुरवठा करण्यात आला आहे का? असा संतप्त सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे.
मराठवाड्यात ६३८ अंगणवाड्यांची कामे रखडली तर ९५ कामे वर्षं उलटुनही सुरूच नाहीत ; ३७ कोटींचा निधी मंजूर केला होता
—-
कुपोषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या ग्रामीण भागातील १३०० अंगणवाड्या स्वतःची इमारत विना उघड्यावर झाडाखाली, समाज मंदिरात, पत्र्याच्या शेडमध्ये,किरायाच्या रूममध्ये भरतात. मराठवाड्यात मागील वर्षी ६३८ अंगणवाडी ईमारती मंजुर करण्यात आल्या होत्या.या इमारतींना मंजुरी दिल्यानंतर कामाचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते.परंतु कंत्राटदारांनी या कामांना गती दिली नाही. एक वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कामांची प्रगती केवळ १४.८९ टक्के आहे अर्थातच यात ४४२ कामे सुरू झाल्याचे कागदावर दाखविले जात असुन ९५ कामे तर अद्याप सुरुच झालेली नाहीत.या कामांसाठी शासनाने ३७.९६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे.सदरील कामे रखडली असतानाही शासन स्तरावरून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही हे विशेष.
अंगणवाडी कामांची स्थिती
——-
पुर्ण – प्रगती – सुरू -नाही
बीड -७५-७७-००
संभाजीनगर -०२-२८-२०
जालना -०४-५४-००
परभणी -१०-११४-००
हिंगोली -००-०७-०१
नांदेड -००-१०७-४४
लातुर -०४-२२-००
धाराशिव -००-३३-३०
जिल्हा निहाय मंजुर अंगणवाड्या आणि अखर्चित (निधी) लाखात
—
संभाजीनगर – ५०- ५५०.७०
बीड -१५२-१२१०
जालना -५८-५३०.९७
हिंगोली -०८-१६.९६
परभणी -१२४-४६०
नांदेड -१५७-७११.७१
लातुर -२६-२९२.५०
धाराशिव -६३-६८.४२
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२



