पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची ‘मॅजिक जालना इनक्युबेशन सेंटर’ भेट

तरूण उद्योजक, विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कल्पक संशोधनाची केली प्रशंसा
जालना, दि.26 — जालना येथील हुतात्मा जनार्दन मामा नागपूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘मॅजिक जालना इनक्युबेशन सेंटर’ ला राज्याच्या पर्यावरण वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री, तथा पालकमंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी विद्यार्थी व तरुण उद्योजकांशी संवाद साधुन, त्यांच्या कल्पक संशोधनाची माहिती घेतली. तसेच ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ च्या स्थापनेमुळे युवकांना नवीन उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण व सुविधा मिळणार असून, नवउद्योजकांना स्टार्टअप कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे बँक व शासकीय योजनांशी जोडणी करून आर्थिक साहाय्य मिळविण्याची संधी, कौशल्य, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा थेट अनुभव, जिल्ह्यातील नव्या उद्योग जगतात सक्रिय सहभाग व संधी उपलब्ध होणार असल्याच्या पालकमंत्री मुंडे यावेळी म्हणाल्या.
यावेळी खासदार कल्याण काळे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्यासह ‘मॅजिक जालना इनक्युबेशन सेंटर’ चे प्रतिनधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
••••



