क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये अभिवादन

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये अभिवादन
बीड (प्रतिनिधी):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम या विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.ए. हावळे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक संतोष मेश्राम, यु.बी.पवळ व आर.डी. घुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपल्या प्रतिपादनातून प्रगट केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक बी.ए. हावळे यांनी भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांचे भारतीय समाजव्यवस्था अन् सुधारणेत मोलाचे योगदान, शिक्षण, दलितांना समाजात स्थान, अनिष्ट रूढी, प्रथा यांच्या विरोधात लढणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रास्ताविक संतोष मेश्राम आणि आभार प्रदर्शन डब्ल्यू.एस.वाघमारे यांनी केले. याप्रसंगी श्रीमती एन.जी.मुंडे, आनंद छात्रालयाचे अधिक्षक डी.व्ही. खरसाडे शिक्षकेतर कर्मचारी एलबी हजारे सुभाष गायकवाड भारत कोळेकर बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



