संपादकीय

ओमिक्रॉनचा एकही रुग्ण भारतात नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

 

मुंबई | कोरोना संसर्गाने संपूर्ण जगाला मागच्या दोन वर्षांपासून विळखा घातला आहे. ह्या संसर्गाचा धोका कमीकमी हळू होत असं वाटतं असतानाच आता ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान या संदर्भात आता केंद्रीय मंत्र्यांनी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे.आज राज्यसभेत बोलताना देशात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत दिली आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आजच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत बोलताना आरोग्यमंत्र्यांनी देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, नवा व्हायरस जगभरातील 14 देशांमध्ये आढळून आला आहे. परंतु, भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

तसेच एखादा संशयित रुग्ण जरी आढळला तरी त्वरित त्याची चाचणी करुन जिनोम सिक्वेंसिंगही करण्याचे निर्देश देशभरात देण्यात आले आहेत. सध्या भारतात कोरोनाच्या संसर्गाचा जोर कमी होत असल्याची परिस्थिती आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. नवीन कोरोनाबाधित आणि बाधितांच्या मृत्यू संख्येतही घट होत आहे.

Back to top button