बीड
पर्यावरण मंत्री मा.पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 3000 वृक्षांची भेट – बीडमध्ये घनवनाचा प्रेरणादायी उपक्रम”

पर्यावरण मंत्री मा.पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 3000 वृक्षांची भेट – बीडमध्ये घनवनाचा प्रेरणादायी उपक्रम”
बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील घाटसावळी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.चंद्रकांत फड यांनी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री मा.पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी आपल्या स्वमालकीच्या जमिनीवर घनवन पद्धतीने तब्बल 3000/ हजार वृक्षांची लागवड करून एक सजीव जंगल निर्मितीचा संकल्प केला आहे.या वृक्षारोपणामध्ये पिंपळ,वड,कांचन,अडुळसा,मेहंदी, इंग्रजीचिंच, कडूलिंब, करंज, सिताफळ, शंकेश्वर, हातगा, बेल, शेवगा, काटेसावर, सिसम, चिंच, कवटउंबर, तुळस, कढीपत्ता, आवळा, आपटा, गावठी आंबा, रातराणी, कनेर, जास्वंद, बांबू, तुती,कोरफड अशा स्थानिक आणि उपयोगी वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे. हे संपूर्ण रोपण स्थानिक सामाजिक वनीकरण,वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली व वनस्पती संशोधकांच्या सल्ल्याने यात प्रा. पाटील अरुण सर,वनपाल मोरे, वनरक्षक केदार,बांगर मॅडम,सुरवसे मॅडम,सत्य वृक्ष पूजा रचनाकार महेशजी खरे,डोमरी गुरुकुल मुख्याध्यापक चव्हाण अण्णा यांच्या सहकार्यानेकरण्यात आले आहे.या उपक्रमाच्या निमित्ताने वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींना स्नेहभोजन, आरोग्य तपासणी आणि विविध सेवा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव फड तर प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य सर्जेराव तात्या तांदळे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री सलीम भाई जहांगीर,प्रदेश उपाध्यक्ष अनिल चांदणे, बीड शहराध्यक्ष अशोक लोढा, बीड ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष मनोज पाटील, बालाघाट मंडळाचे अध्यक्ष अशोक रसाळ,वडवणी मंडळ अध्यक्ष सुखदेव रेडे,विलास मोमीन, रिपाई नेते सुभाष तांगडे, मा सरपंच नागेश शिंदे,प्रा. तिडके तेजस,विठ्ठल नाना शिंदे,विलास बामणे,संजय काळे,अमोल वडतीले,हरीश खाडे,आप्पासाहेब झोडगे,नरेश पवार,महादेव नागरगोजे,अशोक घोडके,वामन मुंडे,बाळासाहेब हावळे, अशोक मुंडे,सटवा भाऊ मुंडे,वचिष्ट मुंडे,सोमनाथ मुंडे,गोरख मुंडे,नारायण मुंडे,अशोक घिगे,बाबासाहेब शिंदे,गणेश पवार,ज्ञानेश्वर बांडे,शाम राऊत,अशोक वैद्य, अंगद देवडकर,सचिन तीपटे,विशाल वाघमारे,गोरख बाबर,सुन्दर लांडे,गोविंद कोळेकर,रमेश लांडे,गाडे सर,मुलानी सर,बडे सर,विठल लांडे,उजगरे,संजय फड जावळे, मुळे, सूत्र संचलन अजिनाथ शेरकर यांनी केले यांच्या सह कार्यक्रम संपन्न करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले असे सुबोध फड ,कृ उ बा स संचालक नितीन फड,संतोष खवतड, बारीक कडेकर, महेश खवतड,बाबू फड बीड विधानसभेतील सर्व नूतन पदाधिकारी यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता.
समाजाच्या सर्व थरातील नागरिकांना एकत्र आणून पर्यावरण संरक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक उत्कृष्ट नमुना या उपक्रमातून साकारण्यात आला आहे.
श्री.चंद्रकांत फड यांचे सामाजिक योगदान केवळ पर्यावरणापुरते मर्यादित नसून, ते तरुणांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात तसेच गोरगरिबांना मदत, सुसंस्कृत आणि जागरूक तरुण घडविण्याच्या कार्यातही सक्रियपणे सहभागी असतात. त्यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांग हिरवीगार करणे हे एक मोठे स्वप्न असून, त्यासाठी त्यांनी अनेक शासकीय, सामाजिक आणि राजकीय स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.



