📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गेवराई नगर परिषदेने नागरिकांना घरे दिल्याचे समाधान : माजी आ. ॲड. लक्ष्मण पवार राहिलेला विषय तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

गेवराई नगर परिषदेने नागरिकांना घरे दिल्याचे समाधान : माजी आ. ॲड. लक्ष्मण पवार
राहिलेला विषय तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
गेवराई (प्रतिनिधी) – गेवराई शहरातील अतिक्रमित लाभार्थ्यांना पीटीआर वाटप करून त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पक्की घरे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नगरपरिषद सभागृहात माजी आमदार ॲड. लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. शहरातील ४५१ पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून, ती नगरपरिषदेच्या बैठकीत तात्काळ मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना माजी आ. पवार यांनी दिल्या.
बैठकीत बोलताना माजी आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, अतिक्रमित भागातील पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये असलेल्या त्रुटी तातडीने दूर करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यापूर्वी अतिक्रमण भागात उपलब्ध असलेल्या पीटीआरवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
“शहरातील नागरिकांना स्वतःच्या हक्काची घरे मिळाल्याचे समाधान आहे. उर्वरित लाभार्थ्यांचाही प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अतिक्रमित लाभार्थ्यांना पीटीआरसह पक्की घरे उपलब्ध करून देणे हेच अंतिम ध्येय असून, ही प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, मुख्याधिकारी व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीस मुख्याधिकारी विक्रम महाडूरके, नगरपरिषद उपाध्यक्ष भगवान घुंबार्डे, माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, माजी सभापती भरत गायकवाड, कृष्णा पाटोळे, सभापती महेश सौंदरमल, सय्यद बदियोद्दीन, प्रशांत राख, ॲड. सोपान मडके, शेख शाहेदाद, सय्यद अय्युब, पिटू साळवे, शेख मुददशीर, शौकत पठाण, दाऊद पठाण, आकेफ काझी, कृष्णा काकडे, विनायक गिरी, मतीन कुरेशी, नागेश पंडित, लक्ष्मण चव्हाण, राम पवार, सालम चाऊस, ज्ञानेश्वर भाले, सज्जू बागवान, माऊली बेदरे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
Back to top button