दीनदयाळ बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

दीनदयाळ बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-दीनदयाळ नागरी सहकारी बॅंक म. अंबाजोगाई ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, गोपीनाथराव मुंडे सभागृह, खोलेश्वर महाविद्यालयात नुकतीच रविवार, दिनांक २४ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या सुरूवातीला दीनदयाळ नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सन्माननीय संचालकांनी प्रतिमांचे पुजन केले प्रार्थना घेण्यात आली. सभेस उपस्थितांचे स्वागत प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. सभेत अहवाल वर्षातील जे थोर नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, साहित्यिक, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ, भारतमातेचे रक्षण करताना शहिद झालेले सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, बँकेचे आजी माजी सभासद, खातेदार, हितचिंतक, ज्ञात व अज्ञात अशा ज्या व्यक्तींचे निधन झाले, तसेच पहेलगाम येथील आतंकवादी हल्यात मृत्युमुखी पडलेले हिंदु पर्यटक, ऑपरेशन सिंदुरसाठी शहीद झालेले भारतीय जवान, पद्मभुषण भारतीय प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसेन व भारतीय उद्योगपती रतन टाटा तसेच बँकेचे कर्मचारी यांच्या कुटुंबातील निधन झालेले व्यक्ती या सर्वांच्या दुःखात दीनदयाळ बॅंक परीवार सहभागी आहे. अशा सर्वांना नम्रतापूर्वक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व शांती मंत्राचे पठण संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर यांनी केले. सभेच्या सुरूवातीस ‘सायबर सेक्युरीटी’ बाबत संगणक विभागाने माहिती दिली. बँकेतील वसुलीचे काम करणारे कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देण्यात येवून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. बँकेच्या अध्यक्षांच्या अनुमतीने सभेस सुरूवात करण्यात आली. सभेत दिलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व विषय हे संचालक यांनी सभेत मांडले. बँकेच्या अध्यक्षांनी सन २०२४-२५ सालासाठी ४ टक्के लाभांश वाटपाची घोषणा केली. सभेत अचानक उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना बँकेच्या अध्यक्ष व संचालक यांनी सकारात्मक उत्तरे दिली. बँकेचे उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांनी अहवालाचे वाचन केले, तर मागील सभेचे वाचन संचालक जयकरण सुरेशकांबळे यांनी केले. अलेखापरिक्षीत ताळेबंद व नफातोटा पत्रकाचे वाचन संचालक मकरंद कुलकर्णी यांनी केले. अंदाजपत्रकातील खर्चात कमी जास्त झालेल्या खर्चास सभेत संचालक डॉ.विवेक दंडे यांनी वाचन केले. नफा वाटणी पत्रकाचे वाचन संचालक अशोकराव लोमटे यांनी केले. २०२५-२६ सालासाठी केलेल्या अंदाजपत्रकाचे वाचन संचालक किसन पवार यांनी केले. रूपये ३.०० लाखांवरील भांडवली खर्चाचे वाचन संचालक ऍड.अशोकराव कुलकर्णी यांनी केले. बँकेच्या उपविधीतील दुरूस्तीचे वाचन संचालक बाळासाहेब देशपांडे यांनी केले. वैधानिक लेखापरिक्षणाचे वाचन संचालक जयकरण सुरेशकांबळे यांनी केले, संचालक मंडळ सदस्य व नातेवाईकांना दिलेल्या कर्जासंबंधी घोषणा पत्र संचालक मकरंद कुलकर्णी यांनी केले. सतत समावर्ती लेखापरिक्षकांची नेमणुकी बाबतचा ठरावाचे वाचन संचालक अशोकराव लोमटे यांनी केले. तर वैधानिक लेखापरिक्षकांच्या नियुक्तीसाठी केलेल्या शिफारशीचे वाचन संचालक डॉ.विवेक दंडे यांनी केले. एकमुस्त कर्ज भरणा तडजोड योजनेस अनुसरून २०२४-२५ या आर्थिक वर्षात अनुप्त्पादक कर्ज खात्यास मान्यते बाबत ठरावाचे वाचन संचालक बाळासाहेब देशपांडे यांनी केले. १०० टक्के तरतुद असलेल्या बुडीत व संशयीत कर्जखात्याचा वसुलीचा हक्क अबाधित ठेवून खाते निर्लेखित करण्यास मंजुरी बाबतचा ठराव संचालक मकरंद कुलकर्णी यांनी मांडला. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात अदा न झालेला लाभांशाची रक्कम राखीव निधीस वर्ग करण्यास मान्यतेचा ठराव संचालक ऍड.अशोकराव कुलकर्णी यांनी मोडला. रिझर्व बँक अ.क्र. ७.४ या निकषांस अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भात माहिती सादर करणे ठरावाचे वाचन संचालक ऍड.अशोकराव कुलकर्णी यांनी केले. कायदा कलम २६ (२) अ च्या परंतुकान्वये बँकेच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहु न शकलेल्या सभासदांची रजा मान्य करून सभासदांना क्षमापित करणे बाबतचा ठराव संचालक किसन पवार यांनी मांडला. सभेच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी मार्गदर्शन केले. तर आभार उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांनी मानले. तर सभा समाप्तीची अध्यक्षीय घोषणा व सभा समाप्तीनंतर उपस्थितांना भोजनाचा आस्वाद घेण्यात यावा बाबत सुचना प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी महेश शेळके यांनी केले. सभा हसत- खेळत वातावरणात पार पडली. सभेस मोठ्या प्रमाणात सभासदांची उपस्थिती होती. तसेच सर्व शाखेचे व मुख्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व सेवक वर्ग उपस्थित होता.
=======================
*नोट – बातमी सोबत फोटो.*
=======================



