बीड

नेत्रदान श्रेष्ठ दान उपक्रम : आदित्य महाविद्यालयात ९ जून रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन

नेत्रदान श्रेष्ठ दान उपक्रम : आदित्य महाविद्यालयात ९ जून रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन
प्रतिनिधी | बीड
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्नित तथा आदित्य शिक्षण संस्था संचलित आदित्य कृषी व संलग्न महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘नेत्रदान श्रेष्ठ दान’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. समाजामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण करणे, नेत्रदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा,संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबवले जातात.त्याचाच एक भाग म्हणून या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व मानव सेवेची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हे व्याख्यान मंगळवार, ९ जून २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदित्य आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. ते उपस्थितांना नेत्रदानाचे सामाजिक, वैद्यकीय, नैतिक व मानवतावादी महत्त्व याविषयी सविस्तर व मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा हे राहणार आहेत.या व्याख्यानास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रासेयो विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
—-
एक नेत्रदान-दोन व्यक्तींना प्रकाशदान नेत्रदानामुळे मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांमधून दुसऱ्या गरजू व्यक्तीला दृष्टी मिळू शकते. नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती मानवतेची सर्वोच्च सेवा मानली जाते. अंधत्वाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना नवजीवन देण्याचे सामर्थ्य यात असल्याने प्रत्येकाने या विषयाकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे.
Back to top button