मुंबई

राज्य सरकारला उखडून टाकण्याच्या नड्डा यांच्या विधानावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी थेटमहाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती आता या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.तसेच सबुरीचा सल्ला दिला आहे.

‘भाजपाची भूमिका मी समजू शकतो. महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करुनही महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लावता आला नाही. केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव, पैसा वापरूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणे स्वाभाविक आहे. जेपी नड्डा हे एक सद्गृहस्थ आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका असे सांगितले आहे. त्याच्या आधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने घुसखोरी केली आहे आणि गाव वसवलेले आहे आधी ते उखडून फेकले पाहिजे, असे राऊत म्हणाले.

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी वाढले आहेत त्यांनी ताबडतोब उखडून फेकले पाहिजे. अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून दशतवाद्यांना या दोघांना उघडून झाले की मग त्यांनी महाराष्ट्राकडे वळावे आणि जी काही राजकीय उखडबाजी करायची आहे ती करावी. लोकशाही मार्गाने एखादे सरकार हलवण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करायची असेल तर ती सीमेवर चीनने गावे वसवली आहेत त्यांना उखडण्यासाठी तुम्हाला काही करता येत असेल तर देश त्याविषयी समजून घेण्यासाठी उस्तुक आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Back to top button