स्मशानातील शांतता आता तहसील कार्यालय कर्जत येथे कधी मिळणार या वंचित आदिवासी समाजाला न्याय .. ॲड.डॉ. अरुण आबा जाधव

स्मशानातील शांतता आता तहसील कार्यालय कर्जत येथे
कधी मिळणार या वंचित आदिवासी समाजाला न्याय ..
ॲड.डॉ. अरुण आबा जाधव
जामखेड प्रतिनिधी – आज दि.22 सप्टेंबर 2025 रोजी आदिवासी समाजातील मयत बीबी शैनास पवार पाटेवाडी खंडोबा वस्ती ता.कर्जत जि. अहिल्यानगर हे कुटुंब गेली पन्नास वर्षापासून पाटेवाडी खंडोबा वस्ती या ठिकाणी रहिवासी आहेत मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवत असे.. शासकीय जागेत दफन करण्यास विरोध केल्यामुळे मयत बीबी शैनास पवार हिचे प्रेत तहसील कार्यालय कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे आणण्यात आले आहे तसेच गावगुंड बाळू किरदात संतोष कदम व त्यांचे सहकार्य यांचा वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते ॲड.डॉ.अरुण आबा जाधव व कर्जत येथील वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्याच्या वतीने वतीने जाहीर निषेध करण्यात आला
दि.21सप्टेंबर 2025 रोजी रात्री दहा वाजता बीबी शैनास पवार हिचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे मदत बीबी हिला चार मुले व एक मुलगी पती असे तिचे कुटुंब आहे वरून पावसाने थैमान घातले होते मयत कुटुंबातील नातेवाईक व चिल्या पिल्यांचा आरडाओरडा चालू होता मयत बीबी हिची अंत्यविधी शासनाच्या जागेत दफन करण्यासाठी घेऊन जात असता पाटेवाडी येथील हिंसक प्रवृत्तीचे लोक यांनी गरीब आदिवासी समाजातील मयत त्या ठिकाणी करून देण्यास नाकार दिला व मयत कुटुंबाला व त्यांच्या नातेवाईकाला धमकी व धक्काबुक्की करण्यात आली मयत कुटुंबाची आरडा ओरडा होत असताना सुद्धा त्यांना त्या कुटुंबाची दया आले नाही असे हे निष्ठुर प्रवृत्तीचे गावगुंड बाळू किरदात संतोष कदम असे हे दोन गुंड या गोरगरिबाना दुःखाच्या परिस्थितीमध्ये छळणारे धमक्या देणारे अशा या गुंडांचा प्रशासनाने तातडीचा निर्णय घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली
स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर जिवंत असूनही वेदनेचा काहूर कुठल्याच सुविधा मिळत नाही आणि मेल्यानंतरही दफन करण्यासाठी गावातील गावगुंड बाळू संतोष शासनाच्या जागेत दफन करून देत नाही यापेक्षा कुठल्याच वेदना मोठ्या नाहीत पाटेवाडी खंडोबा वस्ती येथील आदिवासी हा समाज गेले अनेक कित्येक दिवसापासून त्याच जागेवरती अनेक मयत झालेल्या लोकांची दफन केलेली आहे तरीपण त्या ठिकाणी आता दफन करण्यास देण्यास नाकार देतात आदिवासी समाजामध्ये प्रेताला अग्नी दिली जात नाही.. जसे की मुस्लिम समाजामध्ये तसेच ख्रिश्चन समाजामध्ये दफन केले जाते त्याचप्रमाणे आदिवासी पारधी समाजामध्ये मयत प्रेताला दफन केले जाते …
यावेळी प्रशासनाने सर्व घटना समजून घेऊन तहसील कर्मचारी बरबडे साहेब सहाय्यक महसूल अधिकारी कर्जत पोलीस निरीक्षक एस पी शिरसाट साहेब ग्रामसेवक राहुल घोडके साहेब तलाठी सागर भापकर साहेब यांनी समझोता काढून प्रेताचे दफन पाटेवाडी येथील त्याच जागेवर करण्यात सांगितले व दोन गुंडांना बाळू किरदात व संतोष कदम यांना अटक करण्याचे आश्वासन दिले यानंतर प्रेत पाटेवाडी कडे हलवण्यात आले यावेळी सोमनाथ भैलुमे वंचित बहुजन आघाडी जिल्हा युवक अध्यक्ष पोपट शेटे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संजय शेलार भाऊसाहेब जावळे विकास समुद्र रंगिशा काळे तुकाराम पवार ललिता पवार शितल पवार दिगंबर पवार कांबळे सर ऋषिकेश गायकवाड संतोष चव्हाण आप्पा सरोदे कांबळे सर उपस्थित होते..



