बीड
विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमापासून दूर रहा ! ध्येय निश्चित पूर्ण होतील-प्राचार्य डॉ.संतोष उंदरे

सौ.के.एस.के.महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न
बीड(प्रतिनिधी)ः विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेताना ध्येय निश्चित केल्यास व समाजमाध्यमापासून दूर राहिल्यास ध्येय निश्चित पूर्ण होतील. प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास नोैकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.त्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत विद्यार्थी वर्गात येणार नाही.तोपर्यंत विद्यार्थी दिशाहीन बनत चाललेला आहे. त्यामुळे न घाबरता महाविद्यालयातील विविध उपक्रमात सहभाग घेऊन स्वतःला यशस्वी करण्यासाठी गुणवत्ता पूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे असे विचार प्राचार्य डॉ.संतोष उंदरे यांनी सौ.के.एस.के.महाविद्यालयातील विज्ञान मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर हे होते.
प्राचार्य डॉ.संतोष उंदरे सर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना बी प्लॅन तयार ठेऊन जी संधी मिळेल त्याचे सोने करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची भित्ती न बाळगता बेसिक ज्ञान आत्मसात करा. आई वडीलांना विसरू नये व त्यांचा अपेक्षा भंग करू नका असे मौलिक विचार यावेळी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून काम केल्यास ते यशस्वी होतील.आज अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध असून विविध प्रकारच्या विद्यार्थ्याांना शिष्यवृत्या उपलब्ध आहेत. संधीच सोन करून स्वतः यशस्वी व्हा ! नियमीत महाविद्यालयात होणार्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. परिश्रमाशिवाय ध्येय गाठता येत नाही.असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रूपेश कोकाटे यांनी तर सूत्रसंचालन डॉ.सोनाजी गायकवाड व आभार प्रा.दीपक पवार यांनी मानले.या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.अनिता शिंदे, पदव्युत्तर संचालक डॉ.ए.एस.खान सर , विज्ञान मंडळाचे डॉ.अनिल शेळके,डॉ.अशोक नागरगोजे,प्रा.विकास पवार,प्रा.किर्ती पांडूळे महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

प्राचार्य