संपादकीय

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकार घेणार सलमान खानची मदत

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर राबवण्यात येत असून राज्यात १० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. मात्र अद्यापही राज्यात असे काही भाग आहेत जिथे वेगवेगळ्या गैरसमजांमुळे लोकं करोनाविरोधी लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेषत: मुस्लीम बहुसंख्या असणाऱ्या भागांमधील नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत.

यासाठीच आता ठाकरे सरकारने नवा प्लॅन आखला आहे. ठाकरे सरकारच्या या प्लॅनमध्ये बॉलिवूडचा भाई जान म्हणजेच, अभिनेता ‘सलमान खान’ महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हंटले जात आहे. सलमानच्या मदतीने मुस्लीम बहुसंख्या परिसरांमध्ये लसीकरणाबद्दल जनजागृती केली जाणार आहे. कोरोना लसीकरण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे. मात्र काही भागांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल. याशिवाय सलमानप्रमाणे मोठा चाहता वर्ग असणाऱ्या अन्य अभिनेत्यांचेही लसीकरणाबाबतचे व्हिडिओ तयार केले जातील. असं देखील राजेश टोपे यावेळी म्हणाले.

Back to top button