बीड

पर्यटकांच्या बेदरकार ड्रायव्हिंगला लगाम घाला! श्रीवर्धनवासियांची मागणी

पर्यटकांच्या बेदरकार ड्रायव्हिंगला लगाम घाला! श्रीवर्धनवासियांची मागणी

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या हरिहरेश्वर, श्रीवर्धन बीच, दिवेअगार या ठिकाणी पर्यटकांच्या संख्येत लक्षनीय वाढ झाली असून पर्यटकांची वर्दळ नेहमीच पाहायला मिळते अशातच मागील काही दिवसांपासून पर्यटकांकडून होणाऱ्या अपघातामध्ये स्थानिक नागरिकांचे नाहक जीव जात आहेत त्यामुळे तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून होत असलेल्या बेदरकार वाहनचालना विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन परिसरातील नागरिकांची  प्रशासनाकडे तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
सुट्टीच्या दिवशी व पर्यटन हंगामात समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे व प्रमुख रस्त्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र अनेक पर्यटक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, भरधाव वेग, दुचाकीवर स्टंटबाजी, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.याचा थेट फटका स्थानिक नागरिक, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीवर्धनवासियांनी एल्गार पुकारला असून, वाहतूक पोलिसांचा कडक बंदोबस्त, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, पर्यटनस्थळी नाकाबंदी, सीसीटीव्ही बसवणे तसेच नियम मोडणाऱ्यांचे वाहन जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पर्यटकांचे स्वागत आहे; मात्र बेदरकारपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
Back to top button