📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

विशाल इंदुरे यांची दगडी शहाजनपूर  गावच्या पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार संपन्न…

विशाल इंदुरे यांची दगडी शहाजनपूर  गावच्या पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार संपन्न…
बीड (प्रतिनिधी)
बीड तालुक्यातील दगडी शहाजनपूर गावच्या पोलीस पाटील पदासाठी कुणबी-मराठा समाजातून चि. विशाल प्रकाश इंदुरे यांची निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईकांच्या वतीने त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्यात श्री क्षेत्र नारायण गडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. महंत संभाजी महाराज यांच्या हस्ते विशाल इंदुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी इंदुरे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. कार्यक्रमाला श्री क्षेत्र नारायणगडचे विश्वस्त दिलीप गोरे, अॅड. महादेवराव तुपे, जे. पी. शेळके सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच गावच्या प्रथम नागरिक सौ. अनिता अण्णासाहेब धुताडमल, तांदळवाडीचे विद्यमान सरपंच श्रीराम सांगुळे, मा. पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल गोरे, मा. उपसरपंच दत्तात्रय नवले, मा. चेअरमन बाबासाहेब सांगुळे, मा. सरपंच श्रीमंत इंदुरे, व्हॉइस चेअरमन भारत सांगुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विशाल इंदुरे यांचे अभिनंदन केले.
यावेळी धर्मराज गोरे, आबासाहेब सांगुळे, बबन गोरे, अमोल सांगुळे, नंदकिशोर खामकर, विक्रम गोरे, रमेश गोरे, अशोक गोरे, रोहिदास गोरे, मारुती गोरे, गणेश घोडके, अनुरथ सांगुळे, देवानंद गोरे, प्रभाकर गवंडे, सिताराम घोरड, दिलीप इंदुरे, राजाराम इंदुरे, विष्णू इंदुरे, महादेव इंदुरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलीस पाटील म्हणून निवड झाल्यानंतर विशाल इंदुरे यांच्यावर गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यामधील दुवा म्हणून काम करत गावात शांतता, सुव्यवस्था आणि एकोपा कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या भव्य सत्कार सोहळ्यामुळे इंदुरे कुटुंबीयांसह ग्रामस्थांच्या आनंदात भर पडली असून, गावाच्या विकासासाठी आणि शांततेसाठी विशाल इंदुरे उत्तम कार्य करतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
Back to top button