संविधान महोत्सवात प्रा.श्रीकांत होशिंग यांचा सन्मान शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान

संविधान महोत्सवात प्रा.श्रीकांत होशिंग यांचा सन्मान
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान
जामखेड प्रतिनिधी:जामखेड शहरात सोमवार,दि. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी भिमसैनिक जामखेड तालुका आयोजित १३ वे संविधान महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांना उल्लेखनीय कार्याबद्दल ल.ना. होशिंग विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. श्रीकांत बाळकृष्ण होशिंग (सर) यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक तथा नगरसेवक अॅड. डॉ. अरुण जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, तहसीलदार मच्छिंद्र पाडळे,ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, दत्तात्रय राजमाने,सादीक शेख,मुकुंद राऊत,संतराम पारखे, युवा नेते आकाश बाफना, प्रा. जाकीर शेख, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, बौद्धाचार्य अशोक आव्हाड, बलभिम जावळे, गोकुळ गायकवाड, राजन समिंदर, बापुसाहेब गायकवाड, रंजन मेघडंबर, अतिश पारवे, मुकुंद घायतडक, डॉ. सचिन घायतडक, संदेश घायतडक, संभाजी आव्हाड, सचिन सदाफुले, किशोर सदाफुले, शेखर घायतडक, विनोद सोनवणे, संदीप तुपेरे, विनोद घायतडक, जितेंद्र आढाव आदी मान्यवर तसेच पत्रकार उपस्थित होते.
प्रा.श्रीकांत बाळकृष्ण होशिंग, माजी प्राचार्य ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड, यांचा शैक्षणिक प्रवास ३५ वर्षांचा आहे. त्यांनी सकाळ वर्तमानपत्रात दहावी साठी लेखन सदर दोन वर्षे चालवले, ‘दहावी साठी तयारी’ या पुस्तकाची निर्मिती केली, विद्यार्थी गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले, वनौषधींची शाळा आणि जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डनचा अभ्यासक्रम राबवला. तसेच मुख्यमंत्री सुंदर शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आणि दहावी-बारावीच्या उत्कृष्ट निकालासाठी प्रयत्न केले.या पुरस्काराबद्दल प्रा.श्रीकांत होशिंग सरांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.



