बीड

आय बी एम् व आर आय सी एच ए फाऊंडेशन पुणे डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनीरिंग चा शैक्षणिक करार

आय बी एम् व आर आय सी एच ए फाऊंडेशन पुणे डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनीरिंग चा शैक्षणिक करार

विद्यार्थ्यांना नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध होणार – प्रा. विकी घायतडक

जामखेड प्रतिनिधी;-दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ वार सोमवार रोजी दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, तंत्रनिकेतन जामखेड यांचा आय बी एम् व आर आय सी एच एम ए फाउंडेशन सोबत शैक्षणिक करार (एम् ओ यु)संपन्न झाला. या करारा साठी प्रोजेक्ट कॉर्डीनेटर विशाल खुणे उपस्थित होते. सदरील करार हा विद्यार्थी व जामखेड करांसाठी अतिशय महत्वाचा आहे. यामुळे नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई इतर कोठेही जाण्याची गरज नाही ग्रामीण भागात या सुख सोईंचा लाभ होणे हे खूप महत्वाचे आहे असे प्राचार्य प्रा. विकी घायतडक यांनी सांगितले. तसेच प्रोजेक्ट काॅर्डीनेटर विशाल खुणे यांनी विदयार्थ्यांना आर्टिफिसिअल इंटिलिजन्स (एआय) तसेच विविध टेक्नॉलॉजि विषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना जॉब मेळावा, इंडस्ट्रियल व्हिजीट ई विषयांसाठी मदत करणार असे सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी तसेच संचालक मंडळाने सदर एम् ओ यु बद्दल प्रा. विशाल खुणे व प्राचार्य व्ही. डी. घायतडक यांचे आभार मानले.

Back to top button