संपादकीय

परमबीर सिंग आणि वाझेंच्या भेटीची गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वझे मार्फत १०० कोटी हप्तावसुलीचा आरोप लगावून एकच खळब उडवून देणारे परमबीर सिह अनेक दिवसांनी समोर आले होतें. त्यातच माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या भेटीबाबत सुरु असलेल्या चर्चेनंतर आता मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

वळसे पाटील म्हणाले, की परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची भेट झाली. यासंदर्भात चौकशी करणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच माहिती दिली जाईल. न्यायालयीन कोठडीत असताना बाहेरच्या व्यक्तींना भेटणे चुकीचे आहे. त्याचबरोबर कर्तव्यावर नसताना सरकारी वाहन वापरणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केबिनमध्ये बसून सुमारे तासभर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर आता मुंबई पोलिस या भेटीचा तपास करणार आहेत. या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले. अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमके काय झाले, याचा तपास पोलिस करत आहेत.

Back to top button