मुंबई

तोपर्यंत समीर वानखेडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दयावा !

 

मुंबई | ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याच्या मुलावर कारवाई केल्यानंतर प्रकाश झोतात आलेले एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्या अधकनी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची झोड होताना दिसत आहे. त्यांच्यावर सध्या अनेक आरोप केले जात असून त्यांना अटक करण्याची मागणीही होत आहे. यामुळे सध्या त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही टीकांचा सामना करत आहे.

अशातच आता वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले दिग्दर्शक हंसल मेहता यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. हंसल मेहना यांनी नुकतंच आर्यन खानला अटक झाल्यानंतर याप्रकरणी वादग्रस्त विधान केलं होतं. आता समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असताना त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी समीर वानखेडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

समीर वानखेडेंवर करण्यात येत असलेले आरोप गंभीर आहेत. त्यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा. असं हंसल मेहता यांनी ट्विट करत म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांनीच आपले निर्दोषकत्व सिद्ध का करावं? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

Back to top button