ओबीसी बहुजन आघाडीच्या बैठकीत एकजुटीचा निर्धार

अमरावती: अंजनगाव सुर्जी येथे काल आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी बहुजन आघाडीच्या बैठकीस शिवसेना (शिंदे गट) चे नेते कॅप्टन अभिजित आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या बैठकीत ओबीसी व बहुजन समाजाच्या हक्क, प्रश्न आणि सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट अत्यावश्यक असून, येणाऱ्या काळात लोकहिताच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने लढा उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. स्पृहा अतुल डकरे, शिवसेना (शिंदे गट) चे समस्त नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच शिवसेना (शिंदे गट) व ओबीसी बहुजन आघाडी युतीच्या उमेदवार सौ. सविता प्रविण पेटकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन उपस्थितांना केले.



