बीड

राज्यस्तरीय इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत नवीन मराठी शाळेचे घवघवीत यश

राज्यस्तरीय इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत नवीन मराठी शाळेचे घवघवीत यश

जामखेड प्रतिनिधी -राज्यस्तरीय इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड आयोजित परीक्षेत जामखेड येथील नवीन मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत असे संपादन केले. यामध्ये इयत्ता चौथी मधील चि.ऋग्वेद अश्विनी पाराजी टेमकर या विद्यार्थ्याने गणित या विषयात राज्याच्या गुणवत्ता यादीत 3 रा क्रमांक पटकावला. त्याला इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परिषदेतर्फे रुशिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच इयत्ता चौथी मधीलच चि.विराज अंजली विजय जेधे या विद्यार्थ्याने इंग्रजी विषयात राज्यात 20 वा क्रमांक पटकावला त्याला इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परिषदेतर्फे एक्सलन्स अवॉर्डने गौरविण्यात येणार आहे .

इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कु.स्वरांजली स्वाती नवनाथ ढेरे या विद्यार्थिनीने गणित विषयात राज्यात 19 वा क्रमांक मिळवला तिला देखील इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परिषदेतर्फे एक्सलन्स अवॉर्डने गौरविण्यात येणार आहे .

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना श्रीमती. वाघ मॅडम, श्रीमती लातूरकर मॅडम व श्री.टेमकर सर यांचे मार्गदर्शन लाभले तर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना श्री सोनटक्के सर यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष,सचिव, कोषाध्यक्ष सर्व संचालक व शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Back to top button