बीड

अनेक वर्षांपासून प्रलंबित चौसाळा ते वाढवणा रस्त्याचा प्रश्न  मार्गी  – अशोक लोढा

अनेक वर्षांपासून प्रलंबित चौसाळा ते वाढवणा रस्त्याचा प्रश्न  मार्गी  – अशोक लोढा

बीड ( प्रतिनिधि) – अनेक वर्षांपासून प्रलंबित चौसाळा ते वाढवणा रस्त्याचा जिव्हाळ्याचा  प्रश्न मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. चौसाळा ते वाढवणा रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत चालू आहे. सदरील कामाची चौसाळा सर्कलचे जि.प.सदस्य तथा भाजपा बीड शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी प्रत्यक्ष पहाणी करून सुरू असलेल्या रस्त्याचे काम निष्कृष्ट पद्धतीने चालू आहे असे लक्षात येताच तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या.

चौसाळा ते वाढवणा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली होती त्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत अशोक लोढा यांनी  मा.ना. पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून चौसाळा ते वाढवणा रस्ता मंजूर करण्यात आला होता. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली यामुळे  नागरिकांचे हाल, पावसाळ्यात तर जास्तच विदारक परस्थिती होते याची जाणीव अशोक लोढा यांना असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा उत्तम दर्जाचा रस्ता तयार व्हावा या साठी प्रयत्न करत आहेत.

या रस्त्याचे काम निष्कृट दर्जाचे चालू आहे. अशी तक्रार वाढवणा आणि पिंपळगाव घाट येथील ग्रामस्थांनी अशोक लोढा यांच्या कडे केली. या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेत ग्रामस्थांच्या उपस्थित रस्त्याच्या  कामाची पाहणी केली. हा रस्ता अत्यंत दर्जेदार आणि मजबूत झाला पाहिजे तसेच जनतेच्या कामात कसलीही तडजोड किंवा हयगय खपवून घेतली जाणार नाही.  अशी स्पष्ट व ठाम भूमिका घेत संबंधित अधिकारी श्री. जोगदंड साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून उत्तम दर्जाचा रस्ता करा अशा सक्त सूचना दिल्या.

          चौसाळा ते वाढवणा रस्ता पूर्ण झाल्यानंतर माळेवाडी,रुई गव्हाण, मानेवाडी, पिंपळगाव घाट, वाढवणा ग्रामस्थांचा दळणवळणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार आहे. जनतेच्या हक्काच्या विकास कामांमध्ये कसलीही कुचराई होऊ न देणे आणि गावखेड्याचा शाश्वत विकास करणे हेच आपले ध्येय,  कर्तव्य आहे अशी भावना अशोक लोढा यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button