
कलावंतांसाठी मानधन सुरू करावे – शंकर शिंदे
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी):- बहिरूपी तसेच गोंधळी, जागरण गोंधळ या माध्यमातून गावोगावी फिरून आपली लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलावंतांसाठी राज्य सरकारने मासिक दहा हजार रुपये मानधन सुरु करावे असे आवाहन शंकर शिंदे यांनी केले.
चौका ता. जि. छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी असलेले शंकर शिंदे सांगतात की आम्ही मागील जवळपास तीन ते चार पिढ्यांपासून गोंधळी, बहुरूपी तसेच जागरण गोंधळ चे काम करतो. आम्ही सतत गावोगावी फिरून आमच्या कुटुंबाचा उदार निवॉह करतो. परंतु आमच्याकडे घरकुल नाही, स्वतःची ओळख नाही. त्यामुळे सरकारने आमच्या मुलांसाठी निशुल्क शिक्षण व हॉस्टेलची व्यवस्था करावी. जेणेकरून आम्हाला मुलाचे भविष्य घडवता येईल. आम्ही ही कला मागील अनेक वर्षापासून जिवंत ठेवली आहे बहुरूपी ही कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कला असून ती आम्ही आजपर्यंत जपून ठेवली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमचा व आमच्या कुटुंबाचा विचार करून आम्हाला कमीत कमी दहा हजार रुपये मासिक मानधन सुरू करावे असे यावेळी शंकर शिंदे म्हणाले.



