बीड

जातिवादी गावगुंडाची दलीत सरपंचांच्या कुटूंबास जिवे मारण्याची धमकी

जातिवादी गावगुंडाची दलीत सरपंचांच्या कुटूंबास जिवे मारण्याची धमकी
दैठणाघाट ता. परळी येथील प्रकार
परळी – प्रतिनिधी :-ग्राम पंचायतच्या कामामध्ये नाक का खुपसतो? म्हणत चक्क सरपंचांच्या कुटुंबांसच शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार बहुचर्चीत परळी तालुक्यातील दैठणाघाट गावात घडला आहे. काल दि.१०-६-२०२५ रोजी या प्रकरणी परळी ग्रामिण ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमासह ॲक्ट्रासीटी ॲक्टने गावातील हनुमंत गुट्टे, शिवाजी गुट्टे, व गोवींद गुट्टे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी कि, बापुराव आप्पा उधारे हे दैडणा घाट गावचे विद्यमान सरपंच आहेत, मात्र ते मागास जातीतील असल्यामुळे त्यांना गावातील वरील गावगुंड हे ग्रामपंचायत मार्फत कुठलेही विकासकाम करू देत नाहीत आणि स्वतःच्या मनमानी प्रमाणे ग्रामपंचायत चा कारभार हाकण्याचा प्रयत्न करतात, सरपंच नात्याने त्यांच्या कारभारास विरोध केल्यानंतर मांगट्यानो तुम्हाला कचऱ्यातून बाहेर काढून इथपर्यंत आनलय आणि तुम्हीच आमच्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज फाटे करता का? असे महणतात.०३ जुन २०२५ रोजी रात्री भरस्त्यात सरपंच पत्नी लताबाई बापुराव उधारे यांना वरील तिघांनी रात्री रस्त्यात अडवून शिवीगाळ आणि संपूर्ण कुटुंबांस जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हयाचा तपास परळी ग्रामिण पोलीस कसा करतात ते लवकरच पहायला मिळणार आहे.
Back to top button