बीड
गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची वंदना: माईलस्टोन स्कूलमध्ये गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी

गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची वंदना: माईलस्टोन स्कूलमध्ये गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी
प्रतिनिधी | बीड:-शहरातील छत्रपती कॉलनीतील माईलस्टोन प्री स्कूल व माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव , बीड मध्ये गुरू पौर्णिमा सोहळा उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. या निमित्ताने शाळेतील चिमुकल्यांनी ‘गुरूवंदना’ आणि ‘गुरूपूजन’ करत आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात “माता हीच पहिली गुरू” या विचाराला साजेशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरूंचा महिमा उलगडला. अनेक चिमुकल्यांनी प्रभावी भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उत्तम भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसाठी आकर्षक ग्रीटिंग कार्ड्स बनवून ‘गुरू’ या संकल्पनेला भावनिक स्पर्श दिला. शाळेचे संचालक ज्ञानेश्वर तांबे, नम्रता तांबे, प्रिन्सिपल सारिका जगताप, समन्वयक रोहिणी गीते यांच्या मार्गदर्शनाखाली गुरू पौर्णिमा उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका स्नेहल जोशी, पल्लवी ढाकणे, प्रीती लामतुरे, आशा जाधव, सुमती कासलीवाल, गंगा शेनकुडे, दीक्षा वाघमारे, संघमित्रा गायसमुद्रे, दीपा आगलावे, स्वातीताई, अयोध्याताई यांनी परिश्रम घेतले. गुरू पौर्णिमेचा हा कार्यक्रम केवळ परंपरेची साक्षरता नव्हे, तर मुलांमध्ये संस्कारांचे बीज रोवणारा क्षण ठरला.
——-
चिमुकल्यांच्या हस्तकलेची गुरूदक्षिणा
—–
गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील छत्रपती कॉलनीतील माईलस्टोन प्री स्कूल व माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव , बीड च्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसाठी खास ग्रीटिंग कार्ड्स तयार केली. रंग-बिरंगी कागदांवर, फुलांच्या रचना, प्रेमळ संदेश आणि ‘आई-वडील हेच माझे पहिले गुरू’ असा भावनिक स्पर्श या कार्ड्समध्ये दिसून आला. या उपक्रमातून केवळ सृजनशीलतेला चालना मिळाली नाही, तर विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञतेची आणि प्रेमाची अभिव्यक्तीही केली. ही ग्रीटिंग्स म्हणजे चिमुकल्यांची खर्या अर्थाने गुरूदक्षिणाच होती.



