📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गोरक्षनाथ टेकडी येथे “गर्भागिरी  प्रदक्षणा “संपन्न  शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचे भव्य पालखी सोहळा 

गोरक्षनाथ टेकडी येथे “गर्भागिरी  प्रदक्षणा “संपन्न
शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचे भव्य पालखी सोहळा
बीड (प्रतिनिधी) गुरुवर्य वैकुंठवासी किसन बाबा महाराज यांनी सुरू केलेल्या गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणा श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गुरुवर्य महंत शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या भव्य दिव्य पालखी सोहळ्याने गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणा सुरू करण्यात आली दरवर्षी पौष वद्य एकादशी श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांची ब्रम्हगिरी पर्वत प्रदक्षिणा यात्रा निघत असते ज्या भाविक भक्तांना ब्रह्मगिरी येथे प्रदक्षिणेला जाता येत नाही अशा भाविक भक्तांना गुरुवर्य किसन बाबा महाराजांनी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणा गुरुवर्य गोरक्षनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये सुरू केलेली आहे.
         श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या पालखी सोबत टाळ, मृदुंग , विना,ढोल ताशे, हलगी पथक, वाजवत, हरिनामाचा जयघोष करत गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या पालखीच्या  ने गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणा सुरवातीला केली संत महंत टाळकरी विणेकरी वारकरी ध्वजधारी यांच्या पाठीमागे हजारो भाविक भक्त गर्भगिरी पर्वत  प्रदक्षिणा मध्ये उपस्थित होते
चौकट:- गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणेचे अध्यात्मिक महत्त्व
संत गहिनीनाथ महाराज यांना गुरु गोरक्षनाथ महाराज यांचा कृपाशीर्वाद होता गहिनीनाथ महाराजांनी संत निवृत्तीनाथ महाराजांना ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा करत असताना अनुग्रह दिला आणि निवृत्तीनाथ महाराजांनी हा अनुग्रह संत ज्ञानेश्वर महाराज यांना दिला या उपदेशातून वारकरी संप्रदायाची स्थापना झाली आणि ज्या भाविक भक्तांना त्रिंबकेश्वर नाशिक येथे ब्रह्मगिरीची पर्वत प्रदक्षिणा करण्याकरिता जाता येत नाही अशा भक्तांना गुरुवर्य किसन बाबांनी गोरक्षनाथ टेकडी येते गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणा सुरू केली होती
Back to top button