📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
रायगड

महाड तालुक्यात पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

महाड तालुक्यात पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

महाड प्रतिनिधी – आदित्य मोहिते
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक वसा लाभलेल्या महाड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसाने कांबळे येथील ऐश्वर्या हेअर कटिंग सलून मध्ये विलास पांडुरंग उल्लालकर या नराधमाने 14 मे रोजी खाऊचे आमिष दाखवून लहान बालिकेला बोलाऊन घेतले व सलून मध्ये तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकार बालिकेने आपल्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी विलास पांडुरंग उल्लालकर याचे मुळगाव नाते विभागातील वरंडोळी हे आहे. सदर इसमाविरुद्ध महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 642 सह बालकांचे लैंगिक अत्याचार पासूनचे संरक्षण अधिनियम 2005 चे कलम 42 5 m 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास प्रभारी पोलिस संतोष जाधव व सहा. पोलिस निरीक्षक वीर राऊत करीत आहेत. सदर घटनेचा तीव्र निषेध सर्व स्तरावरून होत असून आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी समस्त महाड वासियांकडून होत आहे.

Back to top button