बीड

ढगफुटीमुळे गुलशन नगर मध्ये शिरला महापुरचा पाणी अनेक घरांचे नुकसान एक अधिकारी ना नेता भटकला या भागात फक्त फारुख पटेल वगळता

ढगफुटीमुळे गुलशन नगर मध्ये शिरला महापुरचा पाणी अनेक घरांचे नुकसान एक अधिकारी ना नेता भटकला या भागात फक्त फारुख पटेल वगळता
बीड प्रतिनिधि: बीडला काही दिवसापासुन मुसळ धार पाऊस पडत आहे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे व ढगफुटीमुळे बालेपीरच्या नदीकाठी वसलेल्या गुलशन नगर भागाला महापुरचा तडाका बसला नदीचे पाणी एरियेमध्ये शिरल्याने नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते या भागातील तीन ते चार एमएससीबीचे लाईट डी. पी. व अनेक लाईट पोल पुरात वाहून गेले आहे अनेक घरामध्ये पाणी शिरले  खुप नुकसान झालेले असताना एकही अधिकारी नेता व एमएससीबी इंजीनियर या भागात आले नाही की साधी भेट दिली नाही फक्त नगर परिषदेचे गटनेते फारुक पटेल व नगरसेवक शेख सादेख, सलीम खान यांनी या भागाला भेट देवून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या परंतु दोन दिवस झाले हा भाग आंधारामध्ये आहे लवकर नवीन डी पी व पोल बसवण्यात यावे व साफ सफाई स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांची जिल्हा प्रशासनाला आहे.
Back to top button