शेळीला वाचवताना नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या शिंदेवाडी च्या महिलेचा मृत्यू

शेळीला वाचवताना नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या शिंदेवाडी च्या महिलेचा मृत्यू
आष्टी प्रतिनिधी शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून जाणाऱ्या शेळीला वाचण्याच्या प्रयत्नात भागुबाई गोपाळ खंडागळे वय 46 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आपल्या शेळ्यांना चालरण्यासाठी शेतात घेऊन गेल्या होत्या शनिवारी दुपारी चार वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली पाऊस कमी झाल्यानंतरने घराकडे परतण्याचा निर्णय घेतला परत येत असताना अचानक नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये आपली शेळी वाहून जात असल्याने त्यांनी शेळीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्या स्वतःच वाहून गेल्या वेगाने पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळेत्याना स्वतःला सावरताआले नाही आणि खोल पाण्यात बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाली पाटील आणि तलाठी बाळासाहेब बनगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीची पाहणी केली रात्री उशिरा भागुबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व काल रविवारी सकाळी सिद्धेवाडी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले



