📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

दिल्लीत जॉब चोर, वोट चोर, गद्दी छोड या मागणीसाठी DYFI विद्यार्थी युवक संघटनेचे जोरदार आंदोलन

दिल्लीत जॉब चोर, वोट चोर, गद्दी छोड या मागणीसाठी DYFI विद्यार्थी युवक संघटनेचे जोरदार आंदोलन
बीडचे मोहन जाधव सह पदाधिकाऱ्यांना केली अटक
दिल्ली (प्रतिनिधी) – जॉब चोर, व्होट चोर, गद्दी छोड घोषणा देत DYFI चे जंतर मंतर येथे जोरदार आंदोलन झाले यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव सह शेकडो आंदोलकांना दडपशाही करत पोलिसांनी ताब्यात घेतले.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा द्या आणि निवडणूका बॅलेट पेपरवर घ्या या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले यात राष्ट्रीय अध्यक्ष खा.ए.ए. रहिम, महासचिव हेमंगराज भट्टाचार्य महाराष्ट्र डीवायएफआय युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव, नंदू हाडळ, लक्ष्मी शामंतूल, संजय शामंतूल, नसिर शेख, सुहास झोडगे, अनिल ठाकरे, राजेश दळवी, बाळू पंडागळे, किशोर शिंदे, शाम सरोदे, जय, अमन सह शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले.
लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध डिवायएफआय महाराष्ट्र युवक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
Back to top button