बीड
महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण प्रचंड मताधिक्याने विजयी होतील

महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण प्रचंड मताधिक्याने विजयी होतील
पालकमंत्री संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा विश्वास
स्वर्गीय अजित दादा पवारांच्या आठवणीने सतीश चव्हाण भावूक
महायुतीकडून आमदार सतीश चव्हाण यांनी भरला उमेदवारी अर्ज
छत्रपती संभाजीनगर | दि.५ : पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेले एकमेव नेतृत्व म्हणजे सतिश चव्हाण असून एवढ्या कमी वेळात संपूर्ण मराठवाड्यात निवडणूक लढवण्याचं त्यांच धाडस कौतुकास्पद असून महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार म्हणजे सतीश चव्हाण हेच असतील असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सोमवारी (दि.५) जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना महायुतीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघांचे अधिकृत उमेदवार आ. सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर गोदावरी पब्लिक स्कुल येथे जाहीर सभा मराठवाड्यातील मंत्री, आमदार, तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे म्हणाले की, सतीश चव्हाण यांनी आता चिंता करणे सोडून द्यावे कारण आता महायुती झाली असून कोणीही तुमच्या विरोधात आता उभे राहू शकणार नाही. भारतीय जनता पार्टी ची मराठवाड्यातील सर्व यंत्रणा तुमच्या पदवीधर निवडणुकीसाठी काम करणार असून महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार म्हणजे सतीश चव्हाण हे असतील असा विश्वास कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, आपल्याला महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. महायुतीने सतीश चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवुन सर्व नेत्यांचे हात बळकट करण्याची संधी पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने दिली. दादांच्या निधनानंतर सर्व मराठवाडा हा सुनेत्रा वहिनीच्या पाठीमागे आहे हे दाखवून देण्यासाठी सर्व पदवीधरांनीं महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंती क्रमांकाचे मत देऊन प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी बाबासाहेब पाटील यांनी जाहीर प्रचार सभेत बोलतांना केले.
आमदार सना मलिक म्हणाल्या की स्वर्गीय अजित दादांशिवाय मीं इथे उभे राहणे शक्य नव्हते. आज त्यांची आठवण राहिल्या शिवाय राहवत नाही. आपले महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण हे उच्च शिक्षित आहेत.
१८ वर्षांपूर्वी सतीश चव्हाण यांनी आपला प्रवास सुरु केला त्याचा अनुभव खुप मोठा आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव हा पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी सार्थक ठरेल. नव्या विचारांना नव्या संकल्पनाना मूर्त स्वरूप देणं हे उमेदवार सतीश चव्हाण यांना जमतं. सर्वांचे पक्ष वेगळे जरी असले तर महायुतीचा विचार हा एकच आहे आणि हा अनुभव आणि विचारच मराठवाड्यातील पदवीधरांना पुढे घेऊन जाईल. मराठवाड्यातील सर्व तरुणांच्या विकासासाठी सतीश चव्हाण यांनी प्रधान्याने काम केले आहे. असे सांगत त्यांनी एक क्रमांकाच्या मताला पसंती देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आमदार सना मलिक यांनी केले.
तर जाहीर सभेच्या समारोप प्रसंगी बोलतांना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, ७६ तालुके उरलेले प्रचाराचे दिवस १८ आणि त्यात दसरा अशी मिश्किल टीका करत पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की अशी अवघड निवडणूक मीं कधीही लढणार नाही. ही निवडणूक लढवणे म्हणजे मोठे जिकरीचे काम आहे. सतीश चव्हाण ही निवडणूक कसे लढतात हे त्यांनाच माहिती. ज्या ठिकाणी चांगला रिजल्ट येतो मीं तिथेच जातो. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांला खुश ठेवा असा मिश्किल चिमटा उमेदवार सतीश चव्हाण यांना काढत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यकर्त्याची ताकद ओळखणारे आणि तेवढ्याच ताकदीने त्यांचा विश्वास जोपसणारे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर सभेत केले.
जाहीर सभेचे प्रास्ताविक आमदार विक्रम काळे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश सोळंके, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार सुहास शिरसाट, आमदार राजेश विटेकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार राजु नवघरे माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार विजय भांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, भावना नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस लातूर जिल्हाध्यक्ष अफसरबाबा शेख, लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंदराव सुरवसे, जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख आदींसह मराठवाड्यातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 6 वर्षात मराठवाड्यातील पदवीधरांसाठी केलेल्या कामांच्या “कार्य पूर्तता- पर्व तिसरे” या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले…
चौकट….
स्वर्गीय अजित दादा पवारांच्या आठवणीने सतीश चव्हाण भावूक
आमदार सतीश चव्हाण म्हणाले की मागील तीन टर्म पासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचे संधी मला मराठवाड्यातील पदवीधर बंधूभगिनींनी दिली. या प्रवासाकडे मागे वळून पाहत असताना मनात समाधानाची भावना आहे पण त्याचवेळी एका अतिशय मोठ्या पोकळीची जाणीव देखील आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर ज्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वादाने पाठबळ लावले ते माझे नेते स्व.अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. खरं तर आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली मी मागील ती निवडणूक लढवतो आणि जिंकलो देखील. आज निवडणुकीच्या या टप्प्यावर दादांची उणी प्रत्येक क्षणी जाणवते. ही पोकळी कधीही भरून येणार नाही. मात्र दादांनी दिलेली शिकवणूक त्यांनी ठेवलेला विश्वास आणि त्यांनी दाखवली विकासाची दिशा घेऊनच पुढे जाण्याचा माझा निर्धार आहे असे म्हणत ते भावूक झाले. मराठावाड्यातील प्रत्येक पदवीधर इथेच शिकेल, इथेच घडेल आणि इथेच मोठा होईल हा माझा संकल्प असून मला सर्व पदवीधर मतदारांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करावे अशी विनंती महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी केली.
चौकट….
*उमेदवारी अर्ज दाखल करताना खालील मान्यवर उपस्थित होते*
विभागीय आयुक्तालयात आमदार सतीश चव्हाण यांनी महायुतीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाठ इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री संजय बनसोडे आमदार विक्रम काळे आमदार राजेश विटेकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार प्रशांत बंब व आमदार प्रताप पाटील चिखलीकर आदींसह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…


