
बाजीराव पाटील विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.
जांब शिरूर कासार तालुक्यातील जांब येथील बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.योगासनाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगून विद्यार्थ्यांना वेगवेगळे योगाचे प्रात्यक्षिक व सूर्यनमस्कार विद्यार्थ्याकडून करून घेतले यामध्ये ताडासन, भुजंगासन,शिर्षासन,मयुरासन,अनु लोम, विलोम,कपालभाती,आदीयोग प्रकारचा समावेश होता या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब चे मुख्याध्यापक हावळे सर कदम सर बाजीराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक खाडे सर सहशिक्षक मिसाळ सर, मोरे सर, खेडकर सर, जायभाये सर, कराड सर, मस्के सर, सोनवणे सर, जामकर सर, ढास सर,पठाण सर, मोराळे मॅडम, दहिफळे मॅडम शिक्षकेतर कर्मचारी तसेच दोन्ही शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मोरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व विद्यार्थ्यांनी योगासने नियमितपणे करून निरोगी जीवनशैली अंगीकारावी असे आवाहन केले



