📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

नवगण महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा

नवगण महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा
नवगण महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे तसेच उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र मचाले यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुभाष लांडगे यांनी सादर करून विद्यापीठाच्या नामविस्ताराचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व विशद केले. आभार प्रदर्शन डॉ. राजा आचार्य यांनी केले.
यावेळी भीमगीत गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वनिल कांबळे, डॉ. मनोज प्रकाश व संजय वडगावकर यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थितांमध्ये प्रेरणा व उत्साह निर्माण केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डॉ. महेश दाडगे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे विद्यापीठाच्या वैचारिक परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये दृढ होते, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
Back to top button