मुंबई

दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याच्या फडणवीसांच्या विधानाचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला समाचार

 

मुंबई | राज्यात ड्रग्स प्रकरणावरून चांगलेच राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी थेट विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा सदाला होता. या टिकेनानतंर फडणवीस यांनी सुद्धा पत्रकार परिषेद घेऊन थेट नवाब मलिक यांना लक्ष करून दिवाळीनंतर बॉम्ब फोडून असे आव्हान दिले होते. आता या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लागलेला आहे.

काही जण म्हणताहेत की दिवाळीनंतर बॉम्ब फोडू. पण राजकीय बॉम्ब फोडायला दिवाळी लागत नाही. मी तर पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटतील, याची वाट पाहतोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.तसेच घरातून काम करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, मला मंत्रालयात जाऊन पाट्या टाकायला आवडत नाही. मी घरून होईल तेवढे काम करतो. काम कुठूनही करा घरातून करा किंवा मंत्रालयातून करा, जनतेचं काम होणं, त्यांच्या समस्या सुटणं महत्वाचं असत असं म्हणत विरोधकांना जोरदार टोला लागलेला आहे.

तसेच मागच्या दीड वर्षांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवरूनच सरकारचा बहुतांश राज्यकारभार पाहिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, ते मंत्रालयात जात नाही. ते राज्यकारभार घरातूनच चालवत असल्याचा आरोप विरोधात बसलेल्या भाजपने अनेकदा केला होता. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच घरातून काम करण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.

Back to top button