मुंबई

मोठी बातमी | मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी बंद पाडले कोस्टल रोडचे काम

 

अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प वारली कोळीवाड्यातील मच्छिमारांनी बंद पडले आहे. मच्छिमारांच्या एकही मागणी मान्य न करता मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे.आज मच्छिमारांकडून अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात वातावरण चिघळले होते

समोर आलेल्या माहितीनुसार कोस्टल रोड प्राधिकरणाने परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छिमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशी माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिलेली आहे.

मच्छिमारांनी आता पर्यंत समतोल भूमिका घेतली होती परंतू आता प्राधिकरणाच्या अश्या हुकूमशाही पद्धतीच्या कामकाजावर आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी मच्छिमारांनी तीव्र भूमिका घेतली आहे. जो पर्यंत मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत कोस्टल रोडचे काम बंद करण्याची भूमिका घेतली आहे.

Back to top button