अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवण्यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी आजाद मैदान मुंबई येथे होणा-या आंदोलनाला मा.आ. विजय राजे पंडित साहेबांचा जाहिर पाठिंबा
बीड प्रतिनिधि: अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवण्यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी आजाद मैदान मुंबई येथे होणा-या आंदोलनाला गेवराईचे लोकप्रिय आमदार व बीड मतदार संघाचे मार्गदर्शक मा.आ. विजय राजे पंडित साहेबांनी पाठिंबा जाहिर करुन अधिवेशनामध्ये या विषयाला लक्षवेधी घेवू व आजाद मैदान मुंबई येथे भेटही देवू असे आश्वासन दिले.
राज्यात अल्पसंख्याक समाजावर होणा-या अन्याय अत्याचाराविरोधात जसे मॉबलिचिंग, जातीय दंगली, हेटस्पिच (बेताल वक्तव्य) सोशलमीडिया वर जातीयवाचक मजकुर टाकुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे याला आळा घालण्यासाठी व राज्यातील अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम बौद्ध क्रिश्चियन जैन पारसी सिख घटकांचे संरक्षण व्हावे या करिता अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी आजाद मैदान मुंबई येथे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनाला पाठिंबा जाहिर केल्याबद्दल आमदार साहेबांचे अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले सोबत बीड नगराध्यक्ष प्रतिनिधि शेख मुजीब साहेब व नगरपालिका सभापती शेख निजाम सरकार होते.