बीड

देशव्यापी बंद निमित्त इंटक, किसान, व ईपीएसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

देशव्यापी बंद निमित्त इंटक, किसान, व ईपीएसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बीड( प्रतिनिधी ) : कामगारांनी शंभर वर्षाच्या लढ्यातून कामगारांच्या हिताचे निर्माण केलेले कामगार कायदे मोदी सरकारने रद्द केले आहेत. कामगार विरोधी मालक धार्जीन्या चार श्रमसंहिता  लागू केल्या आहेत. वेतन संहिता,औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामकाज परिस्थिती संहिता,जन सुरक्षा कायदा, रद्द करण्यासाठी देशव्यापी बंद निमित्त सीटू, किसान सभा, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), सेवानिवृत्त ईपीएस राष्ट्रीय समन्वय समिती नवी दिल्ली, शेतमजूर युनियन (लाल बावटा)  जाती अंत संघर्ष समिती, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, डीवायएफआय, एसएफआय, जनवादी महिला संघटना आदी राष्ट्रीय स्तरावरील विविध संघटनेचे जिल्हा स्तरावरील संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.आपापल्या संघटनेची निवेदने तहसीलदार यांना देण्यात आले. या संपात काँग्रेस इंटक संघटना, ईपीएस 95 पेन्शनर्स संघटना, किसान सभा, बांधकाम कामगार संघटना,लाल बावटा कामगार युनियन,आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण आहार संघटना, असंघटित कामगार संघटना आदींचा सहभाग होता. सेवानिवृत्त ईपीएस सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे विभागीय तथा जिल्हाध्यक्ष डॉ.संजय तांदळे, रंजीत डावकर, सुदाम कोळेकर,डी.आर.शेवलीकर भाऊसाहेब फुंदे, दिलीप चिंचोलकर, आर.डी. जोगदंड, बी.एस.गीते किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डी.जी. तांदळे, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस ( इंटक) जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, सखाराम बेंगडे, संदीप झिंजुर्डे,मारुती आघाव, सदाम शेख ,सकलेन शेख, भीमराव कुटे, शेखआमेर पाशा,महादेव कुरवडे,लेक लाडकी अभियानचे जिल्हाध्यक्ष बाजीराव ढाकणे आदींचा सहभाग होता.
Back to top button