बीड

जामखेड येथे पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांचा सन्मान

जामखेड येथे पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांचा सन्मान

काळ बदलला तरी पत्रकार न्यायासाठी पुढे – पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी

जामखेड प्रतिनिधी: आजही काळ जरी बदलला असला, तरी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून देशातील पत्रकार, गोरगरीब, वंचित जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे अशा पत्रकारांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे प्रतिपादन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले.
दि. ६ जानेवारी पत्रकार दिन जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, नासीर पठाण, वसंत सानप, मिठूलाल नवलाखा, दत्तात्रय राऊत, प्रकाश खंडागळे, संजय वारभोग, यासीन शेख, सुदाम वराट, अविनाश बोधले, अशोक वीर, ओंकार दळवी, समीर शेख, धनराज पवार, पप्पूभाई सय्यद, निलेश वनारसे, फारुख शेख, अजय अवसरे, अनिल धोत्रे, सचिन आटकरे, शंकर कुचेकर, विजय राजकर आदी पत्रकार तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लियाकत शेख यांनी तर आभारप्रदर्शन पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव यांनी मानले.

Back to top button