रोहा पुणे गाडी उशिरा भर उन्हात ताटकळत प्रवाशांचे हाल

रोहा पुणे गाडी उशिरा
भर उन्हात ताटकळत प्रवाशांचे हाल
रायगड जिल्हा उत्तर उपसंपादक/मंगेश यादव
रोहा पुणे गाडी ही पालीकरांना पुण्याला जाण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे. मात्र वारंवार ही गाडी उशिरा येते. साधारण चार वाजता च्या दरम्यान ही गाडी पालीमध्ये येते मात्र सोमवारी (ता.28) ही गाडी 4:35 वाजता आली. एवढा वेळ प्रवाश्यांना उन्हातान्हात उभे राहून गाडीची वाट पहावी लागली. विशेष म्हणजे महिला, लहान मुले व वृद्धांचे खूप हाल झाले.
पालीतील रस्ते अरुंद असल्यामुळे ही गाडी पाली बस स्थानकात गावातून जात नाही. त्यामुळे गाडीची वाट पाहत पाली खोपोली राज्य मार्गावर मिनीडोअर स्टॅन्ड येथे प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. येथे कोणत्याच प्रकारची शेड नसल्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा व पावसाळ्यात पावसाचा त्रास प्रवाशांना होतो. त्यातच जर बस उशिरा आली तर प्रवाशांच्या त्रासाला पारावर उरत नाही.
सध्या उन्हाळा खूप आहे. त्यात काही शाळांना सुट्ट्या देखील लागल्या आहेत. पर्यटक प्रवासी देखील मोठ्या प्रमाणावर पुणे व खोपोली आदी ठिकाणी जातात. मात्र या गाडीची वाट पाहत प्रवाश्यांना उन्हाचे ताटकळत उभे राहावे लागते. या ठिकाणी प्रवासी शेड बनवावी तसेच वेळेमध्ये बस याव्यात.
संजय लखिमळे, प्रवासी, पाली



