बीड
पाणीटंचाईने तालुक्यात हाहाकार! प्रशासनाच्या दिरंगाईवर पंडित अरबाने आक्रमक

जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; चाराछावण्या सुरू करा, टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी
मांजरसुंबा (प्रतिनिधी) : तालुक्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, जनावरांच्या पाण्याचीही मोठी अडचण निर्माण झाली आहे. गावोगावी पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासाठी विहिरी व इतर जलस्रोतांचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, हे प्रस्ताव अद्याप मंजूर झाले नसल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित आहे. एकीकडे पाण्याची गरज वाढत असताना दुसरीकडे प्रशासकीय प्रक्रियेला विलंब होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.
विशेषतः जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. शेतकरी आणि पशुपालकांसमोर जनावरांना पाणी उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितीचा विचार करून तालुक्यात आवश्यक त्या ठिकाणी चाराछावण्या सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर पंडित अरबाने यांनी प्रशासनाच्या संथ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची वाट न पाहता प्रशासनाने आताच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ग्रामपंचायतींकडून आलेल्या अधिग्रहणाच्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घ्यावा, टँकरचे प्रस्ताव मंजूर करावेत आणि गरजेनुसार चाराछावण्या सुरू करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, जनावरांच्या पाण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे कागदी नियोजन आणि प्रस्तावांच्या प्रक्रियेत वेळ न घालवता प्रशासनाने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करावे. पाणीटंचाईमुळे नागरिक व पशुधनाचे हाल होण्यापूर्वीच तातडीने उपाययोजना कराव्यात, असे पंडित अरबाने यांनी स्पष्ट केले आहे.
पाणीटंचाईचे संकट गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा ग्रामीण जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या मागणीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.