बीड
कलावंतांच्या पाठीशी सदैव उभा – बदामराव पंडित

कलावंतांच्या पाठीशी सदैव उभा – बदामराव पंडित
गेवराईत रंगला गौराई कला महोत्सव
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्याला खूप मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून या सांस्कृतिक परंपरेचे आम्ही साक्षीदार आहोत. स्वरसिद्धी फाउंडेशन यांनी धोंडराई येथे अनेक बाल कलावंतांना घडवून, गेले पाच वर्षापासून माझ्या वाढदिवसाला सातत्याने कार्यक्रम आयोजित करून कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच गेवराई मतदार संघातील सांस्कृतिक क्षेत्रात सर्वत्र कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचे देखील मी अभिनंदन करतो व हा वारसा अशाच पद्धतीने पुढे टिकावा. कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.
स्वरसिद्धी फाउंडेशन धोंडराईच्या अध्यक्ष कु सिद्धेश्वरी कोकाटे आणि रामदास कोकाटे यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौराई कला महोत्सवात ते बोलत होते. दिनांक 20 ते 22 मार्च दरम्यान संपन्न झालेल्या या महोत्सवाचा शुभारंभ युवानेते यशराज पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरपरिषद सभापती शेख शेहदाद, ज्येष्ठ नाटककार ॲड सुभाष निकम, प्रकाश दावणगिरे, सिनेअभिनेते प्रशांत रुईकर, विलास सोनवणे, सचिन काकडे ज्ञानेश्वर मोटे, दीपक गिरी, ॲड प्रशांत वाघमारे, रघुनाथ थोरात, रामदास कोकाटे आदींची उपस्थिती होती. दरम्यान युवानेते रोहित पंडित आणि सौ स्वरूपाताई पंडित यांनी महोत्सवास भेट देऊन बालकालावंतांना शुभेच्छा दिल्या.
तीन दिवस चाललेल्या गौराई कला महोत्सवातील सहा प्रकारांमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमधून कलावंतांनी सांस्कृतिक रंगांची उधळण करत गेवराईतील रसिकांची मने जिंकली.
यावेळी झालेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम- वेदांत सुनील कापसे, दुतीय- आरोही रमेश राऊत, तृतीय -चिन्मय सुदर्शन देशपांडे, उत्तेजनार्थ- गौरी सचिन देशपांडे हे विजय ठरले तर
छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम- रूपाली बाबासाहेब क्षीरसागर, द्वितीय – परिदी वैजनाथ पाखरे, तृतीय- राशी रामेश्वर कदम, उत्तेजनार्थ- इकरा नाजीम शेख,
शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम- सुप्रिया संदीप गलांडे, द्वितीय- श्रीराज सौंदलकर, तृतीय- अर्णव मिथुन खडकीकर,
सुगम गायन स्पर्धेत प्रथम- विनायक कापसे, दुतीय- तनिष्का सुदर्शन देशपांडे, तृतीय- संपदा विजय राजूरकर,
समूह नृत्य स्पर्धेत प्रथम- मंगळागौरी ग्रुप गेवराई, द्वितीय- सिद्धेश्वर विद्यालय ग्रुप माजलगाव, तृतीय- राजमाता जिजाऊ ग्रुप रोहितळ,
वैयक्तिक नृत्य स्पर्धेत बालगट प्रथम- आदिती गणेश बनगे, दुतीय- प्रांजल मनोज टाक, तृतीय- शुभ्रा ज्ञानेश्वर उदावंत, उत्तेजनार्थ- शरयू विक्रम घोरपडे,
वैयक्तिक नृत्य स्पर्धा मोठा गट प्रथम- समृद्धी सतीश काकडे, द्वितीय- संध्या अंकुश मुजमुले, तृतीय- सोनाक्षी कैलास पवळे, उत्तेजनार्थ- समृद्धी ज्ञानेश्वर जंगले हे विजेते ठरले.
विविध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अनुपमा रामदास कोकाटे, अश्विनी रामदास कोकाटे, ज्ञानेश्वर मोटे, विलास सोनवणे, ॲड सुभाष निकम, दीपक गिरी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
छत्रपती शिवाजी महाराज संकुल नगरपरिषद गेवराई येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचे दि 22 मार्च रोजी पारितोषिक वितरण भाजपा नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसंग्रामचे अध्यक्ष कैलास माने, राजाभाऊ तेलूरे, संदीप निकम, माजी सरपंच संतराम काळे, ह भ प तुळशीराम महाराज आतकरे, राजेंद्र बरकसे, विष्णुप्रसाद खेत्रे, मुख्याध्यापक धर्मराज करपे, मुख्याध्यापक देशपांडे, काकासाहेब काकडे, संदीप देशपांडे, पत्रकार सोमनाथ मोटे, सुदर्शन देशपांडे, शेख खाजाभाई आदींसह स्पर्धक, पालक, कलावंत व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास कोकाटे, सूत्रसंचालन प्रशांत रुईकर यांनी तर आभार प्रदर्शन स्वरसिद्धी फाउंडेशनच्या अध्यक्ष सिद्धेश्वरी कोकाटे यांनी केले.



