बीड

व्हॅली व्ह्युव इंटरनॅशनल स्कूलचा  १० वा वार्षिक स्नेहसंमेलन साजरा

व्हॅली व्ह्युव इंटरनॅशनल स्कूलचा  १० वा वार्षिक स्नेहसंमेलन साजरा
शाळेच्या आचार,विचाराने समृद्ध आदर्श नागरिक बनतात प्राचार्या सौ मिसाळ दराडे
कोळगाव बाळासाहेब घाडगे –  गेवराई तालुक्यातील सावरगांव येथील व्हॅली व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावरगाव येथे दि.०९ एप्रिल २०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या आपल्या सुप्तगुणांनी नृत्य आविष्कारात १० वा वार्षिक स्नेहसंमेलन थाटात साजरा केला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मेस्टा जिल्हाध्यक्ष पांडुरंग चांडक, श्रीमंत सानप (मराठवाडा संघटक मेस्टा), पटाईत सर (सागर इंग्लिश स्कूल सिरसदेवी), ज्ञानेश्वर तांबे तांबे (मेस्टा जिल्हा सचिव), शाळेचे संस्थापक अध्यक्ष अँड. विकास मिसाळ, मुख्याध्यापिका सौ विजया मिसाळ, यांची उपस्थिती होती.
     गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील व्हॅली व्हु इंटरनॅशनल अँड ज्युनियर कॉलेज चा नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर कलागुणांना वाव देणारी ठरत असून कला, क्रीडा, सांस्कृतिक शैक्षणिक स्पर्धा परीक्षेत पुढेच पाऊल टाकणारी शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने शाळेच्या वतीने दहावा दि.९ एप्रिल २०२५ रोजी  भव्य नियोजनात स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आले होते. आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना बौद्धीक विकासा बरोबरच भावनिक व मानसिक कलेचा विकास व्हावा या साठी जीवनात कला हवीच नृत्य,नाट्य,खेळ या आधाराने ही बालमने ख-या अर्थाने आचार,विचाराने समृद्ध होतात आणि हीच चिमुकली पुढे जाऊन आदर्श नागरीक बनतात असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विजयश्री मिसाळ दराडे यांनी सांगितले. आणि या अनुषंगाने देशभक्तीपर गीते, छत्रपती शिवाजी महाराज, रामायण, संत तुकाराम महाराज, संत गोरोबा कुंभार वारकरी संप्रदायाची परंपरा ऐतिहासिक, सांस्कृतिक सामाजिक धार्मिक संस्कृती जतन करून ठेवली पाहिजे यासाठी शाळेने नेहमीच प्रयत्न असते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी देशातील सर्व जुन्या, नवीन गाण्यांचा गीत (नृत्य), देशभक्ती गीत, समूहगीत, समुहनृत्य, लोकगीत, नाटक, पारंपारिक गीत यामधून विविधतेतून एकता दाखवून देणाऱ्या या स्नेहसंमेलनात छोट्या चिमुकल्यांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांची कलाकारी आणि हुशारी दिसून आली. यासाठी शिक्षक वृंदांनी आणि शाळेने घेतलेली मेहनत दिसून आली. विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्तगुणांनी नृत्यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती होते. यावेळी अँड.चत्रभुज मिसाळ, दिलीप पारेकर, सुरेश सावंत, गणेश गटकळ, गणेश धायतीडक, पत्रकार दिनेश गुळवे बाळासाहेब घाडगे, राहुल लोंढे, शरद शेजाळ, सुरेश देवडे, शरद शेजाळ, अमोल मस्के  यासह पालक विद्यार्थी शाळेचे शिक्षक शिक्षिका वृंद, शिक्षत्तेर कर्मचारी उपस्थित होते.
व्हॅली व्हु इंटरनॅशनल स्कूल ला आदर्श शैक्षणिक संकुल बनविणार- अँड विकास मिसाळ
सावरगाव सारख्या ग्रामीण भागात व्हॅली व्हु इंटरनॅशनल स्कूल ही (गेवराई जि बीड) ग्रामीण भागात एक उत्तम शाळा उभी करून या शाळेची एक ओळख निर्माण झाली आहे. शहरी भागाच्या इतर शाळेच्या तुलनेत या शाळेनी कला, क्रीडा, सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात पुढेच पाऊल टाकणारी शाळा ठरली आहे. दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात शैक्षणिक उल्लेखनीय कार्य करत शेकडो स्पर्धेत पारितोषिके जिंकून घेतली आहे. एल के जी शाळेपासून आता माध्यमिक काॅलेज चालू वर्षात सुरू होणार आहे. या शै. संकुलात नेहमीच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि गुणवत्ता कशी वाढेल यासाठी प्रयत्न केला आहे. ही शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी असून आदर्श शैक्षणिक संकुल बनवण्याच्या ध्यास राहणार आहे असे व्हॅली व्हु इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक अध्यक्ष अँड विकास मिसाळ यांनी सांगितले.
Back to top button