बीड
जेष्ठ पत्रकार अशोक शहाराव ‘नॅशनल एडिटर गौरव अवॉर्ड’ने सन्मानित

जेष्ठ पत्रकार अशोक शहाराव ‘नॅशनल एडिटर गौरव अवॉर्ड’ने सन्मानित
पैठण | किरण काळे
पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय व निष्पक्ष कामगिरी करणाऱ्या पैठण तालुक्यातील अमरापूर वाघूंडी येथील जेष्ठ पत्रकार अशोक बाबुराव शहाराव यांना प्रतिष्ठित ‘नॅशनल एडिटर गौरव अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर पत्रकार हितासाठी कार्य करणाऱ्या ‘ऑल इंडिया संपादक संघा’च्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला.
संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष करन सिंह यांच्या हस्ते अशोक शहाराव यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.गेल्या पंधरा वर्षांपासून प्रिंट मीडियामध्ये सक्रिय असलेले शहाराव यांनी निष्पक्ष, रोखठोक आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे वार्तांकन केल्याने त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.सामाजिक, राजकीय तसेच समाजहिताच्या शोध पत्रकारितेमध्ये त्यांनी सातत्याने केलेल्या कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
या सन्मानामुळे पैठण तालुक्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, अशोक शहाराव यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



