बीडमहाराष्ट्रसंपादकीय

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेलवृक्ष रोप वितरण संपन्न


शहरातील सामाजिक ओळख निर्माण करण्यासाठी चंदुलाल बियाणी यांचे उल्लेखनीय कार्य-पी.एन. देशपांडे सर.


परळी वै.:-
पर्यावरण दिनानिमित्त राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण आयोजित राजस्थानी मल्टिस्टेट, गणेशपार शाखा येथे बेलवृक्ष वितरण करण्यात आले. सर्वात प्रथम वैजनाथ प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख उपस्थित असलेले माजी नगरसेवक ओमशेठ सारडा यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन,त्यानां राजेस्थानी मल्टिस्टेट साथी अंक,विचारधन ग्रंथ, विशेष शुभेच्छा संदेशपत्र,देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर बेलवृक्ष महत्व विशद करतांना मुख्य अतिथी पि.एन देशपांडे सर यांनी,सर्वंच झाड हे आपले मित्र असतात हे सांगितले आणि,हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजस्थानी मल्टिस्टेट अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांचे विशेष आधार मानले, व शहराची सामाजिक ओळख निर्माण करण्यासाठी चंदुलाल बियाणी यांच उल्लेखनीय कार्य असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

याप्रसंगी, ऍड दत्ता आंधळे महाराज यांनी देखील, बेलवृक्ष धार्मिक भावना हे दाखला देऊन सांगितले.यावेळी, स्वच्छता सभापती शंकरशेठ आडेपवार, नगरसेवक विजय भोयटे, शिवसेना नेते माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोयटे,ऍड जीवनराव देशमुख, आदर्श शिक्षक पि.एन.देशपांडे सर,महाजन सर,जेष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे,राजकुमार डाके,देशपांडे,डॉ दिनेश लोढा,प्रितम बोरा,यांच्यासह शहरातील ईतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.याचबरोबर राजेस्थानी मल्टिस्टेट गणेशपार शाखा अधिकारी इंगळे सर,गायकवाड सर,भाग्यवंत मॅडम, आयमसी चे राठोडसर,उपरे सर,जठार, राजेस्थानी नागरी पतसंस्था मुख्य वसूली अधिकारी राजेश मोदाणी सर,सोनवणे सर,आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजस्थानी मल्टिस्टेट साथी कार्यकारी संपादक सचिन स्वामी यांनी केले तर,आभार प्रदर्शन राजेस्थानी आयटी सेल प्रमुख अनंत भाग्यवंत यांनी मांडले.

Back to top button