संपादकीय

१०० कोटी लशीचा उत्सव, आता नाना पटोले यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा

 

मुंबई | १०० कोटी लसीचा टप्पा पार झाल्याचे निमित्तांना सर्वत्र देशभरात उत्सव साजरा करण्यात आला होता, मात्र उत्सव कशासाठी हा उत्सव कोरोना काळात तरुण मुलं मेली, आमच्या बहिणीचे कुंकू पुसलं, शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

बीडमध्ये काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला. ‘ज्या पद्धतीने थोतांड तुम्ही या देशात निर्माण केलं,गरिबाच्या घरचे दिवे विझून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केला, याचा विरोध कॉंग्रेस करेल असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

डिझेल,पेट्रोलचे दर वाढवायची गरज नसताना ही दरवाढ केंद्र सरकार करत आहे. तुम्हाला लुटायच काम केंद्र सरकार करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ‘कोरोना काळात फुकट लस दिली म्हणून पेट्रोल डिझेल वाढवले त्यात ८० टक्के लोकांनी लस विकत घेतली २० टक्के लोकांना फुकट दिली. पण १०० कोटी लसीचा उत्सव साजरा करत आहेत, कशासाठी हा उत्सव कोरोना काळात तरुण मुलं मेली, आमच्या बहिणीचे कुंकू पुसलं, शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार? असा सवाल पटोलेंनी उपस्थितीत केला.

Back to top button