बीड

शेतकर्‍याची लेक झाली कृषि उपसंचालक

शेतकर्‍याची लेक झाली कृषि उपसंचालक
नवगण राजुरी दि.21 (प्रतिनिधी)ः- बीड तालुक्यातील काकडहिरा येथील अशोक बागलाने या शेतकर्‍याची मुलगी आणि सौ.के.एस.के. (काकू) कृषि महाविद्यालयाची विद्यार्थीनी रेणूका बागलाने एम.पी.एस.सी. परिक्षा उत्तीर्ण होऊन कृषि उपसंचालक झाली. तिच्या या निवडीबद्दल माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रेणूका अशोक बागलाने या विद्यार्थीनिने इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जि.प. प्रशाला काकडहिरा येथे तर माध्यमिक शिक्षण गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवगण राजुरी येथे पूर्ण करून कृषि पदवीचे शिक्षण सौ. के.एस.के. (काकू) कृषि महाविद्यालय येथे पूर्ण केले त्यानंतर एम.एस्सी. अ‍ॅग्री आणि पी.एच.डी. कृषि विद्यापीठ, राहुरी येथे पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेतून कृषि उपसंचालक (वर्ग 1 पदी) तिची निवड झाली. ती सुरवातीपसूनच अभ्यासात हुशार होती, तीने जिद्दीने स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून कृषि क्षेत्रात उच्च पद मिळविण्याचे ध्येय ठेवले होते. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मार्गदशनावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. काकडहिरा या खेडयागावातून प्रथमच कृषि उपसंचालक वर्ग 1 पदी निवड झाल्याने गावकर्‍यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला तसेच राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रेणूका बागलाने यांची कृषि उपसंचालक वर्ग 1 पदी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करून तिला महाविंद्यालयाच्या वतीने रोख पारितोषीक देण्यात आले. यावेळी दिनकर कदम, विलास बडगे, नानासाहेब काकडे, सखाराम मस्के, डॉ.अरूण भस्मे, अनंत कृषि विकास प्रतिष्ठाणचे सहसचिव गोविंदराव साळूंके, सौ.के.एस.के. (काकू) कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोरे एस.पी., अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सय्यद झेड.एच., कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य पोकळे एस.बी., प्रा.डॉ. शिंदे, एस.टी., प्रा.डॉ. तागड व्ही.बी., संदिपान जाधव, हनुमान धावडे आदि उपस्थित होते.
—————————————————-
Back to top button