बीडमहाराष्ट्रसंपादकीय

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण

आष्टी (प्रतिनिधी):- 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालय आष्टी व आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा यांच्या संयुक्त विद्यमाने मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या शुभहस्ते महाविद्यालय आणि श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात २०० विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यात व देशात सर्वत्र वृक्षारोपण करण्यात येते. कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात यापुर्वीही शेकडो वृक्षांची लागवड करुन त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. कोविड विषयक शासन नियमाचे पालन करून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सावता ससाणे, प्रा.भाऊसाहेब काळे, प्रा.संभाजी ओव्हाळ, वाघ के.डी. यांच्या वाढदिवसानिमित्त मा.आ.भिमसेन धोंडे यांच्या हस्ते वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. शनिवारी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस अजयदादा धोंडे, सरपंच सावता ससाणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, मुख्याध्यापक बाबासाहेब गिर्हे, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ.भगवान वाघुले, गंगाई फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अशोक गदादे,

मुख्याध्यापक संजय कोथमिरे, उपसरपंच विष्णू निंबाळकर, अमोलराजे भुकन, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन मुंडे, वनपाल आर.टी बांगर, बी.एम येवले, वनरक्षक ए.एस काळे, श्रीमती व्ही.जी शिंगटे, सहाय्यक एन.एम बेग, कर्डिले, बोराडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भास्कर चव्हाण प्रा.रघुनाथ विधाते,  प्रा.शैलजा कुचेकर यांच्यासह, शिक्षक व शिक्षकेतर आणि स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी आवळा, शिवण, अडुळसा, सिसम, चिंच, लिंब, वड, पिंपळ, हादगा अशा २०० पेक्षा जास्त झाडांची लागवड करण्यात आली.

Back to top button