बीड

आ.रोहित पवार वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोफत दंत तपासणी

आ.रोहित पवार वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोफत दंत तपासणी

तपनेश्वर येथे १०१, तर शहरात तब्बल ३९७ नागरिकांना लाभ

जामखेड : कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व डॉ. डी. वाय. पाटील डेंटल हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड शहरात भव्य मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

तपनेश्वर येथे नागरिकांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. शहराध्यक्ष राजेंद्र गोरे मित्र परिवाराच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, तपनेश्वर येथे १०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच जामखेड शहरात एकूण ३९७ नागरिकांनी तपासणी व उपचारांचा लाभ घेतला.यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, सचिन शिंदे, देविदास महाडिक, चाँद तांबोळी,भरत कोरडे तसेच आमदार रोहित पवार यांचे आरोग्य विभागाचे समन्वयक मारुती बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरासाठी डॉक्टरांनी विशेष परिश्रम घेतले.

या शिबिरात दात स्वच्छ करणे, दात काढणे यांसह विविध उपचार सेवा देण्यात आल्या.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा असून प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर असे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी सांगितले.

Back to top button