📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता रॅली व नशामुक्ती शपथ

गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता रॅली व नशामुक्ती शपथ

बीड : सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तसेच कला, विज्ञान महाविद्यालय, पिंपळनेर, माय भारत पोर्टल आणि ज्ञानयोग अकॅडमी, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता रॅली व नशामुक्ती शपथ कार्यक्रम चन्हाटा फाटा येथे उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड अरविंद विद्यागर, माय भारत पोर्टलचे युथ ऑफिसर सागर उज्जैनकर, ज्ञानयोग अकॅडमीचे संचालक शिवाजी पवार, प्राचार्य डॉ. बाळासाहेब भांडवलकर, चौसाळा महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. अमर अलदे, लक्ष्मण मळेकर, सौ. के. एस. के. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी. आर. वाणी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे युथ आयकॉन सिद्धार्थ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि युवकांची सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी, स्वयंसेवक व नागरिकांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली. गांधीजींच्या स्वच्छता व समाजसेवेच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्वच्छता रॅली काढण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यजित सर यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. पी. आर. वाणी यांनी मानले. कार्यक्रमास ज्ञानयोग अकॅडमीचे विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास सौ. के. एस. के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील-देवळाणकर व उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. गांधी जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता रॅली व नशामुक्ती उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

Back to top button