बीड

देशातील सर्वोच्च नागरी सन्मानासाठी 31 जुलैपर्यंत नामांकनाची संधी 

 देशातील सर्वोच्च नागरी सन्मानासाठी 31 जुलैपर्यंत नामांकनाची संधी
                   केंद्र शासनाने जारी केलेल्या निकषानुसार पद्मभूषण पुरस्कारसाठी मान्यवरांची शिफारस पद्मश्री पुरस्कार प्राप्त केल्यानंतर पाच वर्षांनी, तर पद्मविभूषण पुरस्कारासाठी मान्यवरांची शिफारस पद्मभूषण पुरस्कार प्राप्त केल्यानंतर पाच वर्षांनी करता येईल. मात्र, अपवादात्मक प्रकरणांमध्ये ही अट शिथिल करण्याचा विचार केला जाऊ शकतो. तसेच शासकीय सेवेतील तसेच सार्वजनिक उपक्रमांतील डॉक्टर व वैज्ञानिक वगळता अन्य कर्मचारी व अधिकारी पद्म पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत असेही शासनाने स्पष्ट केले आहे. लिंग, वंश, व्यवसाय किंवा पदाचा कोणताही भेदभाव न करता कोणतीही व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र आहे. तथापि डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणाऱ्यांसह कार्यरत सरकारी कर्मचारी या पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.  हा पुरस्कार उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यासाठी दिला जातो आणि विविध क्षेत्रांमध्ये, शाखांमधील विशिष्ट व असाधारण कामगिरी किंवा सेवेसाठी प्रदान केला जातो. पद्म पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीमध्ये दिला जातो या तिन्ही पदकांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. पद्मविभूषण हे देशातील दुसरे सर्वोच्च  सन्मान पदक आहे.हे कास्य धातूचे बनलेले असून,त्यावर पद्म आणि विभूषण हे शब्द देवनागरी लिपीत कोरलेले असतात. पद्मभूषण हे देशातील तिसरे सर्वोच्च पदक आहे. हे पांढऱ्या कांश्य धातूचे बनलेले असते. पद्मश्री हे चौथे सर्वोच्च नागरी सन्मान पदक आहे. हे पांढऱ्या कास्यं धातूचे बनलेले असते. पदकाची रचना मध्यभागी कमळाचे फुल कोरलेले असते. कमळाच्या फुलावर पद्म वरच्या बाजूला आणि श्री खालच्या बाजूला हे शब्द देवनागरी लिपीत लिहिलेले  असतात. या क्षेत्रांची प्रातिनिधीक यादी पुढीलप्रमाणे आहे. कला- यात संगीत, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, चित्रपट, नाट्य इत्यादींचा समावेश होतो. समाजसेवा- यात परवडणारी आरोग्यसेवा आणि शिक्षण या क्षेत्रांतील सामाजिक व सेवाभावी कार्य, तसेच पर्यावरण, स्वच्छता इत्यादींसारख्या सामुदायिक प्रकल्पांमधील इतर योगदानाचा समावेश होतो. सार्वजनिक व्यवहार- यात कायदा, सार्वजनिक जीवन,राजकारण इत्यादी क्षेत्रांतील कार्याचा समावेश होतो. विज्ञान आणि अभियांत्रिकी – यात अंतराळ अभियांत्रिकी,अणुविज्ञान, माहिती तंत्रज्ञान,विज्ञान व संबंधित विषयांवरील संशोधन आणि विकास इत्यादींचा समावेश होतो. व्यापार आणि उद्योग – यात बँकिंग,आर्थिक घडामोडी,व्यवस्थापन, तसेच उत्पादन आदरातिथ्य (हॉस्पिटलिटी ), तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, लेखांकन, वित्त, पर्यटन इत्यादी क्षेत्रांतील व्यापार व व्यवसायाचा समावेश होतो. वैद्यकशास्त्र – यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथि, सिद्ध, निसर्गोपचार इत्यादींमधील वैद्यकीय संशोधन आणि विशेष प्राविण्य, विशेषज्ञता यांचा समावेश आहे. साहित्य आणि शिक्षण-  यामध्ये साक्षरता आणि शिक्षणाचा प्रचार, शैक्षणिक सुधारणा, अध्यापन, पत्रकारिता, साहित्य आणि कविता, लेखन इत्यादींचा समावेश आहे. नागरी सेवा – यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रशासन इत्यादी क्षेत्रात मिळवलेले विशेष प्राविण्य,उत्कृष्टता यांचा समावेश आहे. क्रीडा – यामध्ये खेळ,ॲथलेटिक्स,गिर्यारोहण खेळांना प्रोत्साहन इत्यादींचा समावेश आहे. इतर – यामध्ये वर नमूद केलेल्या क्षेत्रांमध्ये समावेश नसलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे.यामध्ये यामध्ये अध्यात्म, योग, वन्यजीव संरक्षण, संवर्धन, पाककला, कृषी, तळागाळातील नवोउपक्रम, पुरातत्त्वशास्त्र, वास्तुकला इत्यादींचा समावेश असू शकतो. मरणोत्तर प्रकरणे – हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जात नाही. तथापि, अत्यंत पात्र आणि दुर्मिळ प्रकरणांमध्ये, सरकार मरणोत्तर पुरस्कार देण्याचा विचार करू शकते. पद्म पुरस्काराच्या उच्च श्रेणीसाठी पात्रता – एखाद्या व्यक्तीला उच्च श्रेणीचा पद्म पुरस्कार तेव्हाच प्रदान केला जाऊ शकतो, जेव्हा पूर्वीचा पद्म पुरस्कार प्रदान झाल्यापासून किमान पाच वर्षाचा कालावधी उलटला असेल. तथापि, दुर्मिळ आणि अत्यंत अपवादात्मक कामगिरीच्या बाबतीत पुरस्कार समितीकडून अपवाद केला जाऊ शकतो.
अलंकार – सनद( प्रमाणपत्र )आणि पदक,  मुख्य पदकाची एक लहान प्रतिकृती( लघु प्रतिकृती )  प्राप्तकर्त्याला स्वातंत्रपणे दिली जाते, जी तो/ ती शासकीय/ औपचारिक कार्यक्रमांदरम्यान इत्यादी ठिकाणी परिधान करू शकतो /शकते, या पुरस्कारांसोबत कोणतेही आर्थिक अनुदान जोडलेले नाही, हा पुरस्कार कोणतीही पदवी मानली जात नाही. आणि कोणत्याही प्रकारे प्राप्तकर्त्याच्या नावापुढे प्रत्यय किंवा उपसर्ग म्हणून वापरला जाऊ नये.पुरस्कार मिळवणाऱ्यांची संख्या – एका वर्षात (म्हणून तर प्रकरणे आणि परदेशी /अनिवासी भारतीय /परदेशी नागरिक वगळून )एकूण 120 पुरस्कार दिले जाऊ शकतात. पद्म पुरस्कारांसाठी प्राप्त झालेली सर्व नामांकने /शिफारसी पद्म पुरस्कार समितीसमोर ठेवली जातात,जी दरवर्षी पंतप्रधानाद्वारे गठीत केली जाते. पुरस्कार समितीच्या शिफारशी शिवाय कोणताही पुरस्कार प्रदान केला जात नाही. समितीच्या शिफारशी मंजुरीसाठी पंतप्रधान आणि भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे सादर केल्या जातात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नावांची घोषणा केली जाते. हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते साधारणपणे दरवर्षी मार्च /एप्रिल महिन्यात प्रदान केले जातात, जेथे पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेली सनद ( प्रमाणपत्र )आणि एक पदक दिले जाते. पुरस्कार पदान समारंभाच्या दिवशी पुरस्कार विजेत्यांची नावे ‘गॅझेट ऑफ इंडिया’ मध्ये प्रकाशित केली जातात. कोण करू शकतात नामांकन – नामांकन प्रक्रिया जनतेसाठी खुली आहे. स्व – नामांकन देखील केले जाऊ शकते. वरील निकषांच्या आधारे शिफारस योग्य प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर https ://padmaawards.gov.in
या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने 31 जुलै 2026 पर्यंत सादर करावेत त्यानंतर या पोर्टलवर कोणतेही नामांकन अथवा शिफारस स्वीकारली जाणार नाही. तरी पद्म पुरस्कारासाठी इच्छुक पात्र व्यक्तींनी दिनांक  31 जुलै 2026 पर्यंत प्रस्ताव, नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर भेट देऊन सादर करावेत असे आवाहन केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. संजय तांदळे ,
शिक्षण व करिअर कौन्सिलर, बीड.
Back to top button