बीड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)पक्षाच्या वर्धापन दिन सोहळा मुंबईत साजरा होणार -जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)पक्षाच्या वर्धापन दिन सोहळा मुंबईत साजरा होणार -जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के

पक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निमंत्रित

बीड प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिना निमित्त मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण मा. खा. शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षते खाली हा वर्धापन सोहळ्याचे भव्य  आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.

दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता  यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई
येथे आयोजित करण्यात आलेल्या या वर्धापन दिन सोहळ्यास राज्यभरातील प्रमुख नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  यांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, पक्षाने मा. पवार साहेब यांच्या खंबीर, संयमी आणि मुत्सद्दी नेतृत्वाखाली जनसेवेचा मोठा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, सहकार, सामाजिक न्याय आणि पुरोगामी विचारांचा वारसा जपत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वर्धापन दिन हा केवळ उत्सव नसून पक्षाच्या संघर्षमय आणि लोकाभिमुख वाटचालीचा गौरवशाली टप्पा आहे.  आगामी काळातील पक्षाची दिशा, संघटन मजबुतीकरण, जनतेच्या प्रश्नांवरील भूमिका आणि कार्यकर्त्यांच्या नव्या उर्जेचा संदेश या सोहळ्यातून दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रमुख पदाधिकारी,आजी-माजीलोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक
लोकसभा विधानसभा निवडणुक उमेदवार,
तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मुंबई येथे उपस्थित राहावे.
“साहेबांच्या विचारांची मशाल अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे.
असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

Back to top button